AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bus Blast in Israel : पेजर हल्ल्याचा बदला बस ब्लास्टने का? इस्रायल बॉम्बस्फोटांनी हादरलं

Bus Blast in Israel : 'पाच बॉम्बना एकसारखेच टायमर लावलेले होते' सैन्य सचिवांकडून अपडेट घेत असून घटनांवर आमची नजर आहे असं इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

Bus Blast in Israel : पेजर हल्ल्याचा बदला बस ब्लास्टने का? इस्रायल बॉम्बस्फोटांनी हादरलं
Israel bus blast
| Updated on: Feb 21, 2025 | 8:06 AM
Share

इस्रायल बॉम्बस्फोटाने हादरलं आहे. तेल अवीव शहरात उभ्या असलेल्या तीन बसेसमध्ये एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. या बॉम्बस्फोटात कोणी मृत किंवा जखमी झालेलं नाही. युद्धविराम करारातंर्गत हमासने काल इस्रायलला चार मृतदेह परत केले. इस्रायल त्या दु:खात असतानाच हे बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांनी 2000 च्या दशकात पॅलेस्टिनी बंडखोरांकडून होणाऱ्या बॉम्बस्फोटांची आठवण करुन दिली. पोलीस प्रवक्ते एएसआय अहरोनी यांनी सांगितलं की, ‘दोन अन्य बसमध्ये स्फोटकं सापडली. पण तिथे स्फोट झाले नाहीत’ इस्रायली पोलिसांनी सांगितलं की, ‘पाच बॉम्ब एकसारखेच टायमर लावलेले होते. बॉम्ब निकामी पथकाने स्फोट होण्याआधीच हे बॉम्ब निष्क्रिय केले’

कोणाला दुखापत झालेली नाही हा चमत्कार आहे असं शहराच्या मेयर ब्रॉट म्हणाल्या. रुट पूर्ण झाल्यानंतर बेसस तिथे उभ्या करुन ठेवल्या होत्या. बस कंपनीच्या प्रमुखाने तात्काळ सर्व बस चालकांना जिथे आहे तिथे थांबण्यास आणि बसची तपासणी करण्यास सांगितलं आहे. ज्या बस सुरक्षित आहेत, त्या पुन्हा आपल्या मार्गावर रुजू झाल्यात. काही महिन्यांपूर्वी इस्रायलने लेबनानमध्ये पेजर ब्लास्ट घडवून आणले होते. त्याचाच हा बदला म्हणून पाहिलं जातय.

कोणावर संशय?

सैन्य सचिवांकडून अपडेट घेत असून घटनांवर आमची नजर आहे असं इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं. इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या शिन बेटकडे चौकशीची जबाबदारी आहे. “एकाच संशयिताने सर्व बसेसमध्ये बॉम्ब ठेवले की, अनेक संशयित आहेत हे शोधून काढलं पाहिजे” असं पोलीस प्रवक्ते हॅम सरग्रोफ म्हणाले. बसमधील स्फोटकं वेस्ट बँकमधल्या स्फोटकांशी मिळती-जुळती आहेत, असं पोलीस प्रवक्त्याने सांगितलं.

आम्ही आमच्या शहीदांचा बदला घेणं विसरणार नाही

हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी केलेल्या हल्ल्यानंतर गाजामध्ये विनाशकारी युद्धाची सुरुवात झाली. इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील संशयित पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर वारंवार छापे मारले. कसम ब्रिगेडची शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गटाने मेसेजिंग App टेलिग्रामवर एक पोस्ट केलेली. “जो पर्यंत आमच्या भूमीवर कब्जा आहे, आम्ही आमच्या शहीदांचा बदला घेणं विसरणार नाही” या गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

इस्रायली सैन्याची कारवाई

19 जानेवारीला गाझामध्ये युद्धविराम लागू झाल्यानंतर वेस्ट बँकमधील तुलकेरेम आणि शहरातील दोन शरणार्थी शिबिरांवर इस्रायली सैन्याने कारवाई केली. याआधी दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये प्रवेश करुन शहरात गोळीबार आणि बॉम्बस्फोट घडवलेत. बॅट यामचे मेयर ब्रॉट यांनी लोकांना सर्तक राहण्याच आवाहन केलय. शाळा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहील असं त्यांनी सांगितलय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.