VIDEO : 10 फुटाच्या हैवानाची दहशत, लोक घर सोडून पळाले, जपानमध्ये नेमकं काय घडलं?
जपानमध्ये ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे, ज्यामुळे उत्तर जपान हादरले. जपान हवामान एजन्सीने (JMA) १० फुटांपर्यंतच्या त्सुनामी लाटांचा गंभीर इशारा दिला असून किनारपट्टी भागातून तातडीने स्थलांतर सुरू आहे.

जपानच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर सोमवारी ८ डिसेंबरला रात्री उशिरा ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाने उत्तर जपान पूर्णपणे हादरले आहे. यामुळे संपूर्ण जपानमध्ये हाहाकार उडाला असून सर्वत्र भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या अनेक शहरांमध्ये इमारती आणि पूल डगमगतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याची भीती आहे.
जपान हवामान एजन्सी (JMA) ने तात्काळ आपत्कालीन इशारा जारी करत किनारपट्टी भागासाठी १० फुटांपर्यंत उंच त्सुनामी लाटांचा इशारा दिला आहे. ज्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत किनारीपट्टी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ११:१५ च्या सुमारास हा भूकंप आला. त्याची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी होती. आओमोरी (Aomori) आणि होक्काइडो (Hokkaido) पासून अंदाजे ५० किलोमीटर खोलवर समुद्रात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
🇯🇵 A 7.6 earthquake hit Northern Japan. Thankfully, I’m too far away to feel it.
I experienced the 3.11.2011 earthquake which was a 9.1… Today I was reminded of that.
We’re praying that everyone will be okay. pic.twitter.com/Ggh7CHDt2J
— 鈴森はるか 『haruka suzumori』 🇯🇵 (@harukaawake) December 8, 2025
शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू
त्सुनामीचा इशारा मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने सुपर इव्हॅक्युएशन (Super Evacuation) मोड सक्रिय केला आहे. त्यामुळे ज्या भागात लाटांची उंची जास्त असण्याची शक्यता आहे, त्या भागांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. उराकावा शहर आणि मुत्सु ओगावारा पोर्ट येथील रहिवाशांना तात्काळ समुद्र किनारा आणि सखल भाग सोडून सुरक्षित उंच ठिकाणी जाण्याचे स्पष्ट आणि तातडीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हाचिनोहे शहर या दाट लोकवस्तीच्या शहरातही मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आहे. अनेक लोक रस्त्यावर उतरले असून प्रशासकीय इमारती आणि उंच हॉटेल्समध्ये आश्रय घेत आहेत. येथे एका हॉटेलमध्ये काही लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जपान हवामान एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार हा धोका अत्यंत गंभीर आहे. समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे. नागरिकांनी अजिबात वेळ न घालवता त्वरित सर्वात सुरक्षित, उंच ठिकाणे शोधावीत. त्सुनामीच्या लाटा अपेक्षेपेक्षा जास्त धोकादायक असू शकतात, असे म्हटले आहे.
जापान में 7.6 तीव्रता की भूकंप आने के बाद सुनामी का अलर्ट जारी है। #earthquake#Japanpic.twitter.com/VsvA0V0zO3
— Shashank Singh (@imShashankji) December 9, 2025
जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
या भूकंपामुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पूर्व जपान रेल्वेने तातडीने आओमोरी ते होक्काइडो दरम्यान धावणाऱ्या सर्व हाय-स्पीड शिनकान्सेन (Shinkansen) आणि एक्सप्रेस रेल्वे सेवा थांबवण्यात आल्या आहेत. हजारो प्रवासी स्थानकांवर अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. त्यासोबतच अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून दळणवळण व्यवस्था देखील प्रभावित झाली आहे. सध्या अधिकारी युद्धपातळीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रशासन सध्या भूकंपानंतरचे लहान धक्के आणि समुद्राच्या पातळीतील बदलांवर सतत लक्ष ठेवून आहे. तसेच नागरिकांना शांतता राखण्याचे आणि केवळ अधिकृत आपत्कालीन सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
