‘दाऊद इब्राह‍िम याने मुस्लिमांसाठी जे केले, त्यामुळे…’, पाकिस्तानी क्रिकेटरने मान्य केले दाऊद सोबतचे नाते

Javed Miandad on Dawood Ibrahim: एका मुलाखतीत जावेद मियांदाद याने अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. दुबईमध्ये आपली दाऊदसोबत पहिली भेट झाल्याचे मियांदाद यांनी म्हटले आहे. दाऊद मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आहे.

'दाऊद इब्राह‍िम याने मुस्लिमांसाठी जे केले, त्यामुळे...', पाकिस्तानी क्रिकेटरने मान्य केले दाऊद सोबतचे नाते
Dawood Ibrahim
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 9:43 AM

कराची | पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदाद याने दाऊद इब्राहीम याच्यासोबत असलेल्या नात्यांवर प्रथमच भाष्य केले आहे. दाऊद याच्याशी निर्माण झालेले नाते हे आपल्यासाठी गौरव असल्याचे धक्कादायक विधान मियांदाद याने म्हटले आहे. एका मुलाखतीत जावेद मियांदाद याने अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. दुबईमध्ये आपली दाऊदसोबत पहिली भेट झाल्याचे मियांदाद यांनी म्हटले आहे. माझ्या मुलाचे लग्न त्याच्या मुलीशी झाले, हा आपल्यासाठी सौभाग्याचा क्षण असल्याचे मियांदाद याने म्हटले आहे.

मियांदाद म्हणतो, दाऊदचे नाव….

मियांदाद याने दाऊद याचा गौरव केला आहे. तो म्हणतो, ”अंडरवर्ल्ड डॉन असलेला दाऊदचे मुस्लिम समाजासाठी मोठे योगदान आहे. त्याने मुस्लिम समाजासाठी जे काही केले आहे, ते सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल.” पुढे जावेद मियांदाद म्हणतो, दाऊदला मी खूप दिवसांपासून ओळखतो. आमच्या कुटुंबांचे जुने संबंध आहेत. वास्तविक, दाऊद इब्राहिमची मोठी मुलगी माहरुख इब्राहिम आणि जावेद मियांदादचा मुलगा जुनैद मियांदाद यांचा विवाह 2005 साली झाला होता. यानंतर दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये दोघांचे ग्रँड रिसेप्शन झाले होते. या लग्नाची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती.

दाऊद भारतातून फरार

1992 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यात दाऊद इब्राहिम याचा मोठा हात आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर तो भारतातून फरार झाला. १९९३सालापासून इंटरपोल त्याच्या शोधात आहे. तो पाकिस्तानात राहत आहे. परंतु पाकिस्तानकडून दाऊत त्यांच्या देशात नसल्याचे म्हटले जाते.

मियांदाद खेळला सहा विश्वचषक

ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट असलेला मियांदाद हा पाकिस्तान क्रिकेटचा मोठा खेळाडू आहे. मियांदादने 1975, 1979, 1983, 1987, 1992 आणि 1996 मध्ये 6 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला. 1992 मध्ये, जेव्हा पाकिस्तानने एकदिवसीय विश्वचषक जिंकला तेव्हा अंतिम सामन्यात त्याने 58 धावांची शानदार खेळी खेळली. मियांदादने पाकिस्तानसाठी 124 कसोटी सामने खेळले आणि 189 डावात 8832 धावा केल्या. तर मियांदादने 233 वनडे सामन्यांच्या 218 डावात 7381 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी सामन्यात 17 आणि एकदिवसीय सामन्यात 7 विकेट आहेत.

Non Stop LIVE Update
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.