नवरा भाड्याने घेणाऱ्या देशात अविवाहित किती? विवाहित आणि घटस्फोटीतांचा आकडा आला समोर… धक्कादायक…
Latvia : लाटविया देशातील अनेक महिलांनी घरकामात मदत करण्यासाठी तात्पुरत्या म्हणजेच भाड्याने घेतलेल्या पतींना कामावर ठेवण्यास सुरुवात केली आहे. या देशात किती लोक अविवाहित आहेत हे जाणून घेऊयात.

जगात महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या जास्त आहे. मात्र काही असे देश आहेत जिथे महिलांची संख्या ही पुरूषांपेक्षा जास्त आहे. युरोपातील एक देश लाटवियामध्ये, महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या देशातील अनेक महिलांनी घरकामात मदत करण्यासाठी तात्पुरत्या म्हणजेच भाड्याने घेतलेल्या पतींना कामावर ठेवण्यास सुरुवात केली आहे. या देशात 100 पुरूषांच्या मागे 115 महिला आहेत. मात्र या देशात लग्न करण्याचा ट्रेन्ड खूप कमी आहे. लाटवियाच्या केंद्रीय सांख्यिकी ब्युरो (CSB) ने धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार 18 वर्षांवरील लोकसंख्येपैकी फक्त 44.6 % विवाहित आहेत आणि 15.6% लोक घटस्फोटित आहेत. या देशात किती टक्के लोक अविवाहित आहेत ते जाणून घेऊयात.
महिला भाड्याने पती घेतात
लाटवियामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या 15.5% ने जास्त आहे. काळ जसा पुढे जात आहे तसा हा आकडाही वाढताना दिसत आहे. या देशातील लोकांचे सरासरी वय 44.1 वर्षे आहे. या देशाचा मृत्युदर प्रति 1000 लोकांमध्ये 14.9 आहे. तसेच जर 100 लोकांनी आत्महत्या केली तर त्यात 80% पेक्षा जास्त पुरूष असतात. या देशातील महिला पुरुषांपेक्षा 11 वर्षे जास्त जगतात. अनेकदा महिलांना कामाचा ताण येतो, त्यामुळे त्या दैनंदिन जीवनातील कामांसाठी पती भाड्याने घेतात. असं असलं तरी या देशात 29.6% लोक अविवाहित आहेत.
एकूण लोकसंख्येपैकी 63% लोक काम करण्यास सक्षम
लाटवियाच्या केंद्रीय सांख्यिकी ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार देशाची लोकसंख्या 18 लाख 57 हजार होती. यापैकी 63% लोक काम करण्यास सक्षम होते. 14 वर्षे आणि त्याखालील मुलांची संख्या 15.1% होती. मुले आणि किशोरवयीन मुलांचे सर्वाधिक प्रमाण रीगा प्रदेशात आहे. तसेच अनेक लोक पिएरिगा प्रदेशात स्थलांतर करतात, त्यामुळे या भागाची लोकसंख्या वाढत आहे.
2024 च्या तुलनेत लाटव्हियाची एकूण लोकसंख्या 1% म्हणजे 18 हजार 400 ने कमी झाली आहे. जन्मापेक्षा जास्त मृत्यूमुळे ही लोकसंख्या घटली आहे. तसेच निव्वळ स्थलांतर किंवा देश सोडून जाणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यामुळेही लोकसंख्या घटली आहे. लिंग गुणोत्तर आणि लोकसंख्यावाढीचा दर नियंत्रित ठेवण्याचे मोठे आव्हान या देशातील सरकारसमोर आहे.
