AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुराण आणि अरबी भाषा लगेच शिकून घ्या, इस्रायलचा आपल्या नागरिकांना तातडीचा आदेश, नेतन्याहू यांचा खतरनाक प्लॅन समोर

मोठी बातमी समोर येत आहे, इस्रायलच्या सरकारने तेथील नागरिकांना कुराण आणि अरबी भाषा शिकण्याचे आदेश दिले आहेत, या आदेशाची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

कुराण आणि अरबी भाषा लगेच शिकून घ्या, इस्रायलचा आपल्या नागरिकांना तातडीचा आदेश, नेतन्याहू यांचा खतरनाक प्लॅन समोर
| Updated on: Jul 09, 2025 | 5:45 PM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सध्या दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी दोन्हीही देशांमध्ये भविष्यातील धोके लक्षात घेऊन अंतर्गत हालचाली सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. आता इस्रायलकडून मोसादचे अधिकारी आणि आपल्या सैनिकांसाठी एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार आता सैन्य दलातील सर्व अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना अनिवार्यपणे कुराण आणि अरबी भाषा शिकावी लागणार आहे, यामध्ये कोणालाही सूट मिळणार नाहीये, इस्रायलच्या सरकारने तसे आदेश जारी केले आहेत.

महत्त्वाची बातमी म्हणजे,समोर येत असलेल्या माहितीनुसार आता इस्रायल आपल्या अभ्यासक्रमामध्ये देखील कुराण आणि अरबी भाषेचा समावेश करणार आहे. इस्रायलच्या सरकारी चॅनलकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2023 मध्ये हमासकडून इस्रायलवर मोठा हल्ला करण्यात आला होता. गुप्तचर यंत्रणाने केलेल्या चुकीमुळे हा हल्ला झाल्याचं मानलं जातं आहे, या रिपोर्टमध्ये असं देखील म्हटलं आहे की, जर सैन्य अधिकारी आणि मोसादच्या अधिकाऱ्यांना अरबी भाषा येत असती तर हा हल्लाच झाला नसता, त्यामुळे आता इस्रायलने आपल्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर अरबी भाषा शिकावी असे आदेश काढले आहेत.

यामुळे काढला आदेश

समोर आलेल्या माहितीनुसार इस्रायल चारही बाजूंनी मुस्लिम राष्ट्रांनी वेढलेला आहे. इस्रायलच्या शेजारी जॉर्डन, तुर्की, साऊदी, यमन आणि लेबनान सारखे देश आहेत. ज्या देशांमध्ये अरबी भाषा बोलली जाते, फक्त इस्रायलच असा एकमेव देश आहे, जिथे हिब्रू भाषा बोलली जाते.

इस्रायल आणि इराणमधील संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे, इराणकडून देखील इस्रायलवर कधीही हल्ला होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. इराणमध्ये देखील अनेक लोक अरबी बोलतात, त्यामुळे इस्रायलकडून आता या भाषेची सक्ती आपल्या अधिकाऱ्यांवर करण्यात आली आहे.

इस्रायलचे जे टॉप कमांडर आहेत त्यांना अरेबी भाषेचं ज्ञान आहे, त्यामुळे ते भाषेच्या जोरावर शत्रू राष्ट्राचे अनेक प्लॅन डीकोड करतात, मात्र इस्रायलमधील सैनिकांचा जो दुय्यम स्थर आहे, त्यांना अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे त्यांना आता अरबी भाषा सक्तीची करण्यात आली आहे.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.