कर्जबुडव्या विजय मल्ल्याला ब्रिटन कोर्टाचा दणका, वकिलांची फी भरण्यासाठी पैसे देण्यास स्पष्ट नकार

विजय माल्याने ब्रिटन कोर्टात कायदेशीर कारवाईची खर्चाची पूर्तता करण्यासाठी तसेच कोर्टाने रोखलेली रक्कम मागे घेण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती (London court refuses release 8 crore to Vijay Mallya)

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला ब्रिटन कोर्टाचा दणका, वकिलांची फी भरण्यासाठी पैसे देण्यास स्पष्ट नकार
Vijay Mallya
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 8:11 AM

नवी दिल्ली : भारतीय बँकांचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय माल्या ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. विजय माल्याने ब्रिटन कोर्टात कायदेशीर कारवाईची खर्चाची पूर्तता करण्यासाठी तसेच कोर्टाने रोखलेली रक्कम मागे घेण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका ब्रिटन कोर्टाने फेटाळली आहे. विजय माल्या 7.69 कोटी रुपये म्हणजे 7,50,000 पाऊंडच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठीचा पुरावा सादर करण्यात अयशस्वी ठरला आहे. (London court refuses to release 8 crore to Vijay Mallya for pay his Indian legal fees)

ब्रिटिश हायकोर्टाचे न्यायाधीश रॉबर्ट माईल्स यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नेतृत्वातील भारतीय बँकांच्या गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. माल्याने आपल्या याचिकांच्या किंमतीचा 95 टक्के खर्च उचलावा, अशी सूचना ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने केली आहे. त्यामुळे माल्याने कायदेशीर कारवाईची खर्चाची पूर्तता करण्यासाठी तसेच कोर्टाने रोखलेली रक्कम मागे घेण्याची विनंती करणारी याचिका फेटाळण्यात आली आहे. यामुळे भारतीय बँकांच्या नेतृत्वात अत्यंत यशस्वीरित्या खेळी करत विजय मिळवला आहे.

खर्चाचे बिल सादर करण्यात अपयश 

ब्रिटिश हायकोर्टाचे न्यायाधीश रॉबर्ट माईल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, या याचिकेत वैयक्तिक कार्यवाहीवरील खर्चाचा तपशील देण्यात आलेला नाही. त्यामुळे यापूर्वी कोणताही खर्चाबाबत काहीही सिद्धता करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. तसेच पैशांची मागणी केली जात असताना या खर्चाचे कोणतेही बिल, वर्णनात्मक माहिती किंवा इतर कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाही.

दरम्यान याआधी फेब्रुवारीच्या सुरुवातीस, लंडनच्या कोर्टाने मल्ल्याला ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या दिवाळखोरी प्रकरणाशी संबंधित खर्च आणि कायदेशीर खर्चाची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी कोर्टाने फंड कार्यालय (सीएफओ) कडून 11,28,70,710 रुपये (11 लाख डॉलर) वापरण्यास मान्यता दिली होती. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 जुलैला होणार आहे.

14 कोटी द्या

भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून मल्ल्या लंडनला फरार झाला आहे. कधीकाळी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या मल्ल्याला आता मात्र आर्थिक घरघर लागली आहे. त्याला लंडनमध्ये हजार आणि लाख रुपयांचाही हिशोब ठेवावा लागत आहे. त्याच्या वैयक्तिक खर्चांनाही चाप लागला असून वकिलांना देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आर्थिक चणचणीमुळे कोंडीत सापडलेल्या मल्ल्याने लंडनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फ्रान्समधील मालमत्ता विकल्यानंतर आलेल्या रकमेपैकी 14 कोटी रुपये आपल्याला देण्यात यावेत, अशी विनंती त्याने या याचिकेतून कोर्टाला केली आहे. लंडनमध्ये मल्ल्याच्या बाजूने खटला लढवणाऱ्या वकिलाला त्याची फी मिळाली नाही. त्यामुळे या वकिलाने पुढच्या सुनावणीपर्यंत रकम न मिळाल्यास खटला लढणे बंद करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. (London court refuses to release 8 crore to Vijay Mallya for pay his Indian legal fees)

संबंधित बातम्या : 

विजय मल्ल्या भारताच्या ताब्यात मिळणार का? आज सुनावणी

विजय मल्ल्याला भारताकडे सोपवा, लंडनमधील कोर्टाचे आदेश

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.