AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत भीषण दहशतवादी हल्ल्याचा ISIS चा कट, थोडक्यात बचावला देश; एफबीआयकडून मोठा खुलासा

एफबीआयने मिशिगनमधील अमेरिकन सैन्याच्या तळावर होणारा ISIS चा मोठा दहशतवादी हल्ला वेळीच टाळला. अम्मार अब्दुल माजिद-मोहम्मद सईद या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सईदने मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्याची योजना आखली होती.

अमेरिकेत भीषण दहशतवादी हल्ल्याचा ISIS चा कट, थोडक्यात बचावला देश; एफबीआयकडून मोठा खुलासा
US Terror Attack
| Updated on: May 15, 2025 | 10:34 PM
Share

अमेरिकेत होणारा एका मोठा दहशतवादी हल्ला थोडक्यात टळला आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) कडून वेळेत हस्तक्षेप करून ISIS च्या एका मोठ्या हल्ल्याची योजना हाणून पाडली आहे. हा हल्ला मिशिगनमधील अमेरिकन सैन्याच्या तळावर केला जाणार होता. एफबीआयच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्याची योजना आखण्यात आली होती. एफबीआयच्या गुप्तचर विभागाने आणि गुप्त अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे या दहशतवादी हल्ल्याच्या योजनेचा पर्दाफाश केला.

एफबीआयचे सहाय्यक संचालक काश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला मिशिगनच्या वॉरेन शहरात असलेल्या अमेरिकन सैन्याच्या तळावर आणि Tank-Automotive & Armaments Command (TACOM) या लष्करी तळावर केला जाणार होता. अम्मार अब्दुल माजिद-मोहम्मद सईद हा या कटामागील मूळ आरोपी होता. तो ISIS च्या सांगण्यावरून काम करत होता. सईदचा मुख्य उद्देश अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करणे आणि मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करणे, असा होता.

सईदवर गंभीर आरोप

एफबीआयनुसार, सईद एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत होता. त्याने हल्ला करण्यापूर्वी त्या ठिकाणाची सर्व माहितीही गोळा केली होती. मात्र, या दरम्यान एफबीआयच्या गुप्त अधिकाऱ्यांना त्याच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्यावर गुप्त पाळत ठेवण्यात आली. यानंतर पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर विदेशी दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणे आणि षड्यंत्र रचणे यांसारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

एफबीआय टीमकडून करडी नजर

एफबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत अनेक तपास यंत्रणांनी एकत्र काम केले. दहशतवादी कारवाईंची तपासणी आणि देखरेख करणाऱ्या टीम संशयित हालचालींवर सतत करडी नजर ठेवून होत्या. सईदसारखे दहशतवादी हे सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड चॅट्सच्या माध्यमातून संपर्क करत असतात. अशाच प्रकारे संपर्क साधत दहशतवाद्यांची षड्यंत्रे जन्माला येतात. या प्रकरणात अशाच पद्धतीने डिजीटलरित्या संवाद साधत कट आखला जात होता.

आमच्या टीमने वेळेत कारवाई केली. ज्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचवले. हे मिशन यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सर्व यंत्रणांचे अभिनंदन. मात्र या प्रकरणामुळे अमेरिकेत देशांतर्गत दहशतवादी धोके अजूनही जिवंत आहेत, हे स्पष्ट पाहायला मिळते. त्यांच्याशी लढण्यासाठी सतर्कता आणि तत्परता हेच सर्वात मोठे शस्त्र आहे, असे काश पटेल यांनी म्हटले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.