Nepal च्या प्रलयाचा थरारक व्हिडीओ, लोक जीवाच्या आकांताने पुढे पळत होते,पाठून पुराचा लोंढा गिळण्यास पुढे सरसावत होता…
नेपाळच्या पुरात आतापर्यंत १६२ जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला आहे. तर १४२ भारतीय बेपत्ता झाल्याची भीतादायक आकडेवारी समोर आली आहे. आता नेपाळच्या रसुआ शहरातील एक भीतीदायक थरकाप उडवणारी व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नेपाळमध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत या पुराने १६२ जणांचा बळी घेतला आहे. बुधवारी सकाळी ९.०० वाजता मोबाईलवर पुराचा अलर्ट मिळाला आणि अवघ्या पंधरा मिनिटात होत्याचे नव्हते झाले. लोकांना पळण्याची संधीही मिळाली नाही तेवढ्यात पर्वतावरुन आलेल्या अक्राळ विक्राळ पुराच्या लाटने त्यांना अक्षरश: गिळंकृत केले. नेपाळच्या रसुआ शहरातील बाजारपेठेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात लोक जीवाच्या आकांताने पुढे पळताना दिसत आहे. तर पाठून चिखलाचा लोंढा त्यांना गिळण्यास सरसावत पुढे येत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून जीवाचा अक्षरश: थरकाप उडत आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
