Nobel Prize 2021: मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना शांततेचं नोबेल जाहीर, स्वतंत्र आणि मुक्त पत्रकारितेवर नोबेलची मोहोर

यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. नॉर्वे येथील नोबेल समितीने शुक्रवारी ही घोषणा केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी या दोघांना या वर्षीच्या शांतता पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समितीने सांगितले आहे.

Nobel Prize 2021: मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना शांततेचं नोबेल जाहीर, स्वतंत्र आणि मुक्त पत्रकारितेवर नोबेलची मोहोर
Maria Ressa and Dmitry Muratov

Nobel Prize 2021 : यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. नॉर्वे येथील नोबेल समितीने शुक्रवारी ही घोषणा केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी या दोघांना या वर्षीच्या शांतता पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समितीने सांगितले आहे. शांततेचा नोबेल नॉर्वेमधून जाहीर केला जातो तर इतर पुरस्कारांची घोषणा रॉयल स्वीडीश अकॅडमी करते.

नॉर्वेमधील नोबेल समितीच्या मते, लोकशाही आणि जगातील शांततेसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत महत्वाचे आहे. मारिया रोसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या संरक्षणासाठी काम केलं आहे. लोकशाही आणि शांतता अबाधित राहण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सरक्षण महत्वाचं असल्याचं नोबेल समितीनं म्हटलं आहे. मुक्त, स्वतंत्र आणि तथ्यांवर आधारित पत्रकारिता प्रोपोगांडाला असत्याला पासून सत्याचं संरक्षण करते, असं नोबेल समितीनं म्हटलं आहे.

मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह कोण?

मारिया रेसा यांनी फिलीपिन्समध्ये सत्तेचा गैरवापर, हिंसा आणि हुकूमशाहीचा वापर उघड करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य वापर केला होता. 2012 मध्ये मारियाने रॅपलरची स्थापना केली. ती या डिजिटल मीडिया कंपनीची सह-संस्थापक आहे आणि ही कंपनी शोध पत्रकारितेत काम करते.

दिमित्री अँड्रीविच मुराटोव्ह देखील एक पत्रकार आहेत. रशियामध्ये नोवाजा गॅझेट नावाच्या वृत्तपत्राची सह-स्थापना केली आहे. नोबेल समितीच्या वतीनं नोवाजा गॅझेट आजपर्यंतचे रशियातील सर्वात स्वतंत्र वृत्तपत्र आहे. नोबेल समितीच्या मते, मुराटोव्ह अनेक दशकांपासून रशियामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करत आहेत.

मुक्त, स्वतंत्र पत्रकारितेचं महत्व अधोरेखीत

सत्तेचा गैरवापर, खोटेपणा आणि युद्धप्रचार उघड करण्यासाठी मुक्त, स्वतंत्र आणि वस्तुस्थितीवर आधारित पत्रकारिता आवश्यक आहे यावर समितीने भर दिला. शांतता क्षेत्रातील पुरस्कारांच्या शर्यतीत हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग, माध्यम अधिकार गट रिपोर्टर विदाउट बॉर्डर (आरएसएफ) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांचा समावेश होता.

इतर बातम्या:

Nobel Prize 2021: भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा, स्युकुरो मनाबे, क्लाऊस हॅसलमन, जियोर्जियो पारिसींचा सन्मान

Nobel Prize: कादंबरीकार अब्दुलरझाक गुरनाह यांना जाहीर, रॉयल स्वीडीश अ‌कॅडमीकडून घोषणा

Nobel Peace Prize 2021 declared to Maria Ressa and Dmitry Muratov

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI