वेडे चाळे… अमर होण्यासाठी कुणी रक्त चढवायचे तर कुणी चमत्कारिक औषधे खायचे, हुकूमशाहांचे कारनामे वाचून थक्क व्हाल
माणसाला कायमचे अमर होण्याची इच्छा अनेक काळापासूनची आहे. जगातल्या प्रत्येक हुकूमशाहाची हीच इच्छा असते. परंतू निसर्गाच्या नियमानुसार आजपपर्यंत कोणीही वाचलेला नाही. चला तर पाहूयात असे काही हुकूमशहा ज्यांनी अमर होण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा गप्पा मारत हिंडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोघे जण मनुष्य १५० वर्षांपर्यंत जीवंत कसे राहू शकतो या विषयावर गप्पा मारत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. त्यांचे म्हणणे होते की जर शरीराच्या अवयवयाचे ट्रान्सप्लांट झाले तर मनुष्य अनेक वर्षे जीवंत राहू शकतो. त्यांच्या सोबत उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन देखील उपस्थित होते.
1. किन शी हुआंग-अमरत्वाच्या शोधात विष खाऊन बसले
चीनचे पहिले सम्राट किन शी हुआंग यांनाही अमर होण्याच्या वेडाने झपाटले होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर अमर होण्यासाठी अमृत शोधायचा प्रयत्न केला. त्यांनी अनेकदा आपल्या सैनिकांना आणि विद्वानांना समुद्राच्या पलिकडील काल्पनिक बेटांवर काही चमत्कारी औषध मिळतंय याच्या शोधासाठी पाठवले. एवढेच नाही तर त्यांनी स्वत:साठी भव्य कबर आणि प्रसिद्ध टेराकोटा आर्मी देखील बनवली. म्हणजे मेल्यानंतरही त्यांना सुरक्षा मिळत राहील. परंतू ज्या गोळ्यांना ते अमृत समजून खात होते. त्यात पारा ( मर्क्युरी ) मिसळलेला होता. त्यामुळे हा पारा त्यांच्या मृत्यूचे कारण बनला, आणि केवळ ४९ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
2. किम इल सुंग- जीवंत राहण्यासाठी भयंकर प्रताप केले
उत्तर कोरियाचे संस्थापक नेता किम इल सुंग यांनी अमर होण्याचा शौक होता. त्यांनी डॉक्टरांना अजब हुकूम देत स्वत:ला शंभर वर्षे जीवंत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी त्यांनी चित्र विचित्र घाबरवणारे उपाय आजमावले. त्यांचे खाजगी डॉक्टर किम सो-योन होत्या. ज्या १९९२ मध्ये साऊथ कोरियात पळाल्या. त्यांनी सांगितले की किम इल सुंग यांनी आयुर्मान वाढवण्यासाठी त्यांनी रिसर्च सेंटर देखील तयार केले होते. परंतू सर्व मेहनत वाया गेली, सुंग यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा सगळ्यात विचित्र शौक काय होता माहितीय त्यांनी तरुणांचे रक्त स्वत:ला चढवले होते. आणि या तरुणांना चांगले खायला प्यायला दिले जात होते. सुंग यांनी आणखी एक छंद होता. ते मुलांशी मस्ती करायचे आणि त्यांच्या अल्लड हालचाली आणि मुद्रा पाहायते. डॉक्टरांना वाटायचे की हसण्याने प्रकृती चांगली रहाते. म्हणूनच बहुतांशी सरकारी तसबिरीत ते हसताना दिसायचे. रंजक गोष्ट म्हणजे उत्तर कोरियात आजही त्यांनी कायम स्वरुपी जीवंत घोषीत केलेले आहे.
