AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी अपडेट! पाकिस्तानला दाखवले दिवसा तारे, बांगलादेशाविरोधात भारताची मोठी ॲक्शन

India took Big action Against Bangladesh : भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणल्या गेले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सीमा रेषेवर पाककडून सातत्याने ड्रोन, मिसाईल हल्ले होत आहेत. भारताने सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यातच आता बांगलादेशाविरोधात सुद्धा मोठी ॲक्शन समोर येत आहे.

मोठी अपडेट! पाकिस्तानला दाखवले दिवसा तारे, बांगलादेशाविरोधात भारताची मोठी ॲक्शन
बांगलादेश मीडियाविरोधात कडक कारवाईImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: May 10, 2025 | 1:11 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणल्या गेले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सीमा रेषेवर पाककडून सातत्याने ड्रोन, मिसाईल हल्ले होत आहेत. भारताने सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लाहोर, कराची, रावळपिंडीसह अनेक शहरातील एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली आहे. पाकिस्तानचे कंबरेड मोडण्यासाठी भारत सज्ज झालेला असतानाच आता बांगलादेशाविरोधात सुद्धा मोठी ॲक्शन समोर येत आहे.

बांग्लादेश मीडियावर थेट कारवाई

भारताने बांगलादेशातील चार वृत्तवाहिन्या जमुना टीव्ही, एक्टर टीव्ही, बांग्लाव्हिजन आणि मोहोना टीव्हीवर कारवाई केली आहे. या वृत्तवाहिन्या पाकड्यांचे गुणगाण करत भारताविरोधात प्रचार करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे चॅनल युट्यूबवर ब्लॉक करण्यात आले. तर हे चॅनल लवकरच बांगलादेशात सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न आहे.

ढाका ट्रिब्यून नुसार, बांगलादेशतील 4 वृत्तवाहिन्यांवर तडक कारवाई करण्यात आली. हे चॅनल भारतात दिसणार नाहीत. बांगलादेशात सुद्धा हे चॅनल बंद करण्याची शक्यता आहे. जमुना टीव्ही, एक्टर टीव्ही, बांग्लाव्हिजन आणि मोहोना टीव्ही सातत्याने भारताविरोधातील पाकिस्तानचा प्रोपोगंडा वापरत असल्याचे समोर आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

चौकशीनंतर थेट कारवाई

हे सर्व चॅनल भारताविरोधात खोटा प्रचार करत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर भारत सरकारने या चॅनल्स विरोधात युट्यूबला कारवाईची मागणी केली. युट्यूबने या चॅनलसंबंधी एक चौकशी समिती गठीत केली. या समितीने हे चॅनल्स अपप्रचार आणि धादांत खोट्या बातम्या प्रसारित करत असल्याचे समोर आले. भारताविरोधात खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचे उघड झाल्यानंतर ही चॅनल भारतात प्रसारित करण्यावर बंदी घालण्यात आली. आता बांगलादेशात सुद्धा ही चॅनल बंद करण्यात येणार आहेत.

या चॅनल्स नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांचे उत्तर काय असेल हे सांगण्याची गरज नाही. कारण या चॅनल्सने खोटी माहिती प्रसारित केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये सुद्धा युट्यूबवरून ही चॅनल हटवण्याची कारवाई होईल. यासोबतच बांगलादेशातील इतर 34 मीडिया हाऊस सुद्धा भारत सरकारच्या रडारवर आले आहेत. तर भारताने पाकिस्तानच्या 16 वृत्तवाहिन्यांना अगोदरच युट्यूबवर बंदी घातली आहे. युनूस सरकारने याविषयी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.