Operation Sindoor : दणका पाकिस्तानला, जिरली चीनची, आता म्हणे, आम्हीही…. पाकची साथ सोडली?
Pahalgam Attack, Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरचे जगभर पडसाद उमटत आहेत. अफगाणिस्तानातील नागरिकांसह बलूच लोकांनी या हल्ल्याचे स्वागत केले आहे. अल कायदाने धमकी दिली आहे. तर आतापर्यंत भारताविरोधात असलेल्या चीनने अचानक सूर बदलला आहे. कारण तरी काय?

पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक केला. या मिसाईल हल्ल्यानंतर शेजारच्या देशात एकच भूंकप आला आहे. भारताने पाकिस्तानची खिल्ली उडवल्याची कबुलीच पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिली. भारत आणि पाकिस्तानमधील या ताणाताणीत अर्थातच चीन नेहमीप्रमाणे पाकिस्तानच्या पाठीमागे उभा ठाकला. ऑपरेशन सिंदूरवर त्याने सुरुवातीला तात्काळ हरकत नोंदवली. हा हल्ला दुर्देवी असल्याचा दावा केला. पण आता चीनचा अचानक सूर बदलला आहे. त्यामागील कारण तरी काय आहे.
नाराजी ते सामंजस्याची भूमिका, चीनचा सूर बदलला
ऑपरेशन सिंदूरनंतर चीनने नाराजी व्यक्त केली होती. भारत आणि पाकिस्तानने या क्षेत्रात शांतता नांदावी आणि स्थिर वातावरण ठेवावे यासाठी तणाव कमी करण्याची भाषा चीन करू लागला आहे. जागतिक समुदायासोबत हा तणाव कमी केल्या जाऊ शकतो, असे चीनचे म्हणणे आहे. बहुधा चीन हा दोन्ही देशांना मध्यस्थीचा प्रस्ताव देऊ पाहत आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाने सध्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तान हे कायमचे शेजारी आहेत. हे दोन्ही देश चीनचे पण शेजारी आहेत. चीन कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. पण आम्ही दोन्ही देशांना आवाहन करतो की त्यांनी या भागात शांतता प्रस्थापित करावी. त्यांनी एकमेकांना युद्धासाठी कारणीभूत आगळीक करू नये, एकमेकांना डिवचू नये, असे चीन म्हणाला.
ऑपरेशन सिंदूरने भारताचा जगाला नवीन संदेश
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जगाला नवीन संदेश दिला आहे. छेडेंगे तो छोडेंगे नही, असा हा दणका आहे. मंगळवारी 6 मे ते बुधवारी 7 मे पर्यंत मध्यरात्र ते भल्या पहाटेपर्यंत पाकिस्तानात घुसून भारताने दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारतीय पायदळ, वायुदल आणि नौदलाने ही संयुक्त कारवाई केली.
पाकिस्तानातील दहशतवादाचा गड असलेल्या बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय, मुरीदके येथील लष्कर-ए-तैयब्बाचे ठिकाण, चक अमरू, सियालकोट, भीमबेर, गुलपूर, कोटली, बाघ आणि मुझफ्फराबाद येथे लष्कराने ड्रोनद्वारे मिसाईल डागली. एकूण 9 ठिकाणांवर भारताने हल्ला केला. कारवाई दरम्यान केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला करण्यात आला नाही.