Pakistan AirStrike : मोठी बातमी, पाकिस्तानचा J-17 फायटर जेटमधून आपल्याच नागरिकांवर Air Strike, अनेक जण ठार
Pakistan AirStrike : पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर एअर स्ट्राइक केला आहे. चिनी बनावटीच्या J-17 फायटर जेटमधून बॉम्ब हल्ला केला. यात अनेक महिला आणि लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान आर्मी या बद्दल मौन बाळगून आहे.

दहशतवाद्यांना मारायला निघालेल्या पाकिस्तान एअर फोर्सने आपल्याच नागरिकांवर बॉम्ब हल्ला केला. यात 30 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी खैबर पख्तूनख्वाच्या तिराह वॅलीमध्ये पाकिस्तानी एअर फोर्सने हा हल्ला केला. पाकिस्तानी एअर फोर्सच्या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी एअर फोर्सने या बद्दल कुठही अधिकृत स्टेटमेंट जारी केलेलं नाही.
सोमवारी 22 सप्टेंबर रोजी पाकिस्तानी एअर फोर्स चिनी बनावटीच्या जे-17 फायटर जेटमधून खैबर बॉर्डरवर एअर स्ट्राइक करत होती. त्यावेळी काही बॉम्ब नागरिकांच्या घरांवर पडले. यात 30 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 20 पेक्षा जास्त लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत.
खैबर बॉर्डरवर स्पेशल अभियान
खैबरमध्ये यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात 700 पेक्षा जास्त दहशतवादी हल्ले झाले आहेत. 258 जवानांचा यामध्ये मृत्यू झालाय. दहशतवादाने हैराण झालेल्या पाकिस्तानी सैन्याने खैबर बॉर्डरवर स्पेशल अभियान चालवण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत डेरा इस्माइल आणि बाजौर भागात पाकिस्तानी एअर फोर्सने एअर स्ट्राइक केला.
पाकिस्तानी आर्मीकडून मोठी चूक
सोमवारी पाकिस्तानी सैन्याने डेरा इस्माइल भागात 7 दहशतवादी मारल्याचा दावा केला. असच एक ऑपरेशन पाकिस्तानी आर्मी तिरहा वॅलीमध्ये करणार होती. पण इथे पाकिस्तानी आर्मीकडून मोठी चूक झाली. पाकिस्तानी आर्मीच्या या चुकीबद्दल स्थानिक मीडियामध्ये काही रिपोर्ट नाहीय.
खैबर अफगाणिस्तानच्या बॉर्डर जवळ
तहरीक ए तालिबान पाकिस्तानची सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना आहे. यूएननुसार, टीटीपी जवळ 6000 पेक्षा जास्त दहशतवादी आहेत. त्यांचे 10 पेक्षा जास्त ट्रेनिंग कॅम्प आहेत. टीटीपीचे दहशतवादी खैबरमध्ये जास्त सक्रीय आहेत. खैबर अफगाणिस्तानच्या बॉर्डर जवळ आहे.
पाकिस्तानात कट्टर मुस्लिम शासन हा टीटीपीचा इरादा
पाकिस्ताननुसार, खैबरमध्ये टीटीपीला अफगाणिस्तान मदत करत आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा नेहमी आरोप होतो. पाकिस्तानात कट्टर मुस्लिम शासन हा टीटीपीचा इरादा आहे.
एअर स्ट्राइक चुकून की जाणुनबुजून?
पाकिस्तान आर्मी भले शांत असेल, पण प्रश्न हा उपस्थित होतोय की, हा एअर स्ट्राइक चुकून झाला की, जाणुनबुजून केला. पाकिस्तानी आर्मीवर खैबरच्या लोकांना छळण्याचा आरोप झाला होता. खैबर प्रांत इमरान खानचा बालेकिल्ला आहे. इमरान खान आणि पाकिस्तानी लष्करात 36 चा आकडा आहे. खैबर पाकिस्तानातील एकमेवर राज्य आहे, जिथे इमरान खान यांचा पक्ष सत्तेवर आहे.
