युद्ध भडकलं? पाकिस्ताकडून थेट एअर स्ट्राईक, अफगाणिस्तानमध्ये हाहाकार; आता तालिबानी…
Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी चकमकीही झाल्या आहेत. आज पहाटे सीमेवर बोल्दाक भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष पहायला मिळाला. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला आहे. यात 12 तालिबानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तसेच 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी चकमकीही झाल्या आहेत. आज पहाटे सीमेवर बोल्दाक भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष पहायला मिळाला. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला आहे. यात 12 तालिबानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तसेच 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यात अफगाणिस्तानचे अनेक रणगाडे उद्ध्वस्त झाले आहेत. यानंतर अफगाणिस्ताननेही प्रत्युत्तर दिल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांनी एकमेकांचे सैनिकांना ठार केल्याचा, हत्याके जप्त करण्याचा, चौक्या ताब्यात घेतल्याचा आणि रणगाडे नष्ट केल्याचा दावा केला होता. हे युद्ध दोन दिवसांपूर्वी सौदी अरेबिया आणि कतारच्या मध्यस्थीनंतर थाबले होते, मात्र आता पुन्हा हल्ले सुरु झाले आहेत. पाकिस्तानने असा दावा केला आहे की, आमच्या हल्ल्यात अनेक तालिबानी चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. तालिबानी सैनिक हत्यारे सोडून पळून गेले आहेत. आमचे सैन्य सीमेवर तैणात असून हल्ला करण्यास तयार आहे.
2 चौक्यांवर हल्ला केल्याचा तालिबानचा दावा
दुसरीकडे अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या दोन चौक्यांवर ड्रोनने हल्ला केल्याचा दावा केला आहे. तालिबानने म्हटले की, आमचा एक ड्रोन पाकिस्तानी सीमेच्या आतमध्ये घुसरा आणि पाकिस्तानी तळांवर हल्ला करून परतला. तसेच दुसरा ड्रोन पाकिस्तानच्या तळावर जाऊन कोसळला. ज्या ठिकाणावरून पाकिस्तान अफगाणिस्तानवर हल्ला करत होते, त्याच ठिकाणी तालिबानने हल्ले केले आहेत. तालिबानने अवघ्या 15 मिनिटात पाकिस्तानी सैन्याचे कंबरडे मोडले असल्याचे समोर आले आहे.
ISIS च्या दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात द्या, अफगाणिस्तानची मागणी
या तणावाच्या काळात अफगाणिस्तानने पाकिस्तानकडे ISIS-खोरासान (दाएश) च्या दहशतवाद्यांना आपल्याकडे सोपवण्याची मागणी केली आहे. यात शहाब अल-मुहाजिर, अब्दुल हकीम तौहिदी, सुलतान अझीझ आणि सलाहुद्दीन रजब यांचा समावेश आहे. अफगाणिस्तान देत दोन TTP गटांनी एकत्र येत पाकिस्तानविरुद्ध खलिफतला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एका गटाचे नेतृत्व मुफ्ती अब्दुर रहमान आणि दुसऱ्या गटाचे नेतृत्व कमांडर शेर खान करत असल्याची माहिती समोर आली आहे.
