AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगाल पाकिस्तानात विमाने उडणार नाहीत? इराण युद्धाचा असाही फटका बसणार

पाकिस्तानची आर्थिक स्थिती आधीच डबघाईला आली असताना तेथील सरकारी विमान कंपनी पीआयए (PIA) अडचणीत आली आहे.

कंगाल पाकिस्तानात विमाने उडणार नाहीत? इराण युद्धाचा असाही फटका बसणार
pia - pakistan
| Updated on: Mar 29, 2026 | 7:41 PM
Share

पाकिस्तानची सरकारी एअरलाईन कंपनी पीआयए ( PIA ) बंद करण्याची वेळ तेथील सरकारवर आली आहे. विमानाचे इंधन अचानक १५० टक्क्यांपर्यंत महाग झाल्याने पाकिस्तानची सरकारी विमाने आता कशी उड्डाण घेणार या कोड्यात पाकिस्तान सरकार आहे. पीआयएचे चेअरमन आरिफ हबीब यांनी इशारा दिला आहे की जर अशाच प्रकारे तेलाच्या किंमती वाढत राहिल्या तर मजबूरीने आम्हाला हवाई सेवा बंद करावी लागेल. आणि कंपनीला मोठे कुलूप लावण्याची नौबत येईल.

पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी आतापर्यंत सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की ही कंपनी संपूर्णपणे बंद करण्याची वेळ आली आहे.याचा फटका त्या सर्वसामान्य प्रवाशांवर होणार आहे. जे कामासाठी आणि आप्तस्वकीयांना भेटण्यासाठी विमान प्रवास करत असतात.

१५० टक्के महाग झाले हवाई इंधन

गेल्या काही आठवड्यापासून विमानाचे इंधन प्रचंड महाग झाले आहे. ही वाढ तब्बल १५० पटीने झाली आहे. विशेष ही वाढ गुपचूप जाहीर करण्यात आली आहे.१ मार्च रोजी जेट फ्युअलची (JP-1) किंमत १९० रुपये प्रति लिटर होती. ती २१ मार्च पर्यंत ४७२ रुपये प्रति लिटर पोहचली. २१ मार्चपासून किंमतीत ८४ रुपये वाढ (२१.६५ टक्के)करण्यात आली. उड्डाणाचा खर्च एवढा प्रचंड झाल्यानंतर एअरलाईन्स कंपनीच्या तोट्याचा भार सर्वसामान्य प्रवाशांच्या तिकीटांवर होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हे परवडणारे नाही.

पीआयएचे कंसोर्टियम चेअरमन आरिफ हबीब यांनी एक इशारा दिला आहे. रविवारी एका चॅनलच्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की जेट फ्युअलच्या किंमती अशाच जर वाढत राहिल्या तर एअरलाईन्स संचलन करणे अवघड होईल.

हबीब यांच्या म्हणण्याचा हेतू हा आहे की इंधनाचे दर असेच वाढत राहिले तर पीआयएला आपले कामकाज बंद करण्यास सज्ज रहावे लागेल. कोणत्याही देशाच्या सरकारी एअरलाईनच्या प्रमुखाने दिलेले अशा प्रकारचे वक्तव्य हे दर्शवते की संकट आवाक्या पलिकडचे आहे. आणि विमानसेवेचा वापर करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या दृष्टीने ही मोठी गैरसोय आहे.

अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका

अचानक इंधनाचे दर वाढण्यामारहे मुख्य कारण अमेरिका आणि इराणच्या दरम्यान सुरु असलेले युद्ध म्हटले जात आहे. या आंतरराष्ट्रीय तणावाने जगातील पुरवठा साखळी अडचणीत आली आहे. जागतिक पातळीवर अनिश्चिततेची परिस्थिती आहे.ज्यामुळे विमान इंधनाच्या पुरवठ्यावर सातत्याने बाधा येत आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...