AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US : त्या माणसाने ट्रम्पना शब्द दिला, तिथेच युद्धात सगळा गेम फिरला, मध्यस्थीमध्ये पाकिस्तानचं उरलं-सुरलं महत्वही संपलं

Iran-US : युद्ध काळात इराण आणि त्या देशात एक करार झालेला. या डील अंतर्गत त्या देशाने इराणला फ्रीज केलेलं 6 अब्ज डॉलर दिले. त्या बदल्यात इराणने हल्ला करणार नाही असं आश्वासन दिलेलं. युद्धात इराणने त्या देशाचं जास्त नुकसान केलं नाही.

Iran-US : त्या माणसाने ट्रम्पना शब्द दिला, तिथेच युद्धात सगळा गेम फिरला, मध्यस्थीमध्ये पाकिस्तानचं उरलं-सुरलं महत्वही संपलं
Iran-US-Pakistan
| Updated on: May 20, 2026 | 4:05 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी घडवून आणण्यासाठी पाकिस्तान खूप पुढेपुढे करत होता. त्यांना युद्ध समाप्तीच श्रेय हवं होतं. त्यासाठी पाकिस्तानात एक बैठक झाली. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स आणि इराणचे प्रमुख नेते इस्लामाबादमध्ये बैठकीसाठी आले. पण यातून काहीच तोडगा निघाला नाही. मध्यस्थीमध्ये पाकिस्तान पूर्णपणे अपयशी ठरला. त्यानंतरही पाकिस्तानने अमेरिकेच्यावतीने इराणशी खूप संदेशाच आदान-प्रदान केलं. पण काही उपयोग झाला नाही. अखेर कतरच्या एन्ट्रीने पुन्हा एकदा अमेरिका-इराणमध्ये शांतता प्रक्रिया सुरु झाली आहे.सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा इराणच्या नवीन प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. “इराणसोबत अणवस्त्र करार होऊ शकतो. म्हणून मी इराणवर हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आहे” असं ट्रम्प म्हणाले.

अमेरिकी मीडियानुसार कतरचे पंतप्रधान अल थानी यांनी राष्ट्रपती ट्रम्प यांना करार घडवून आणण्याचं आश्वासन दिलं आहे. कतरचे पंतप्रधान अल थानी यांना करार घडवून आणण्यात माहीर मानलं जातं. याआधी अमेरिका आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये कतरनेच शांतता करार घडवून आणलेला.

मग, ट्रम्प मागे हटले

कतरने सर्वात आधी सौदी अरेबिया, यूएई या आपल्या सहकारी देशांना विश्वासात घेतलं. कतरने या देशांना समजावलं की, युद्ध पुन्हा सुरु झाल्यास त्यांच्या तेल आणि गॅस डेपोचं नुकसान होईल. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा सौदी अरेबिया आणि यूएईच्या नेत्यांना फोन केले, तेव्हा त्यांनी गॅस आणि तेल प्रकल्पाचं नुकसान होईल असं सांगितलं. त्यानंतर ट्रम्प यांनी हल्ल्याचा निर्णय मागे घेतला.

तेव्हा, पहिल्यांदा इराणने असं लिहिलं

इराण जेव्हा अमेरिकेला प्रस्ताव पाठवण्याची तयारी करत होता. त्यावेळी कतरने इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन लावला. त्या प्रस्तावात अणवस्त्रांचा उल्लेख असला पाहिजे हे स्पष्टपणे सांगितलं. पहिल्यांदा इराणने अणवस्त्र बाळगणार नाही असं लिहिलय.

इराणसाठी हा मोठा दिलासा

इराणने अणवस्त्रांच्या मुद्यावर होकार दिल्यानंतर त्यांना तेल विक्रीची परवानगी देण्यास अमेरिका राजी झाला आहे. इराणला आता आपलं तेल सहज विकता येईल. इराणसाठी हा मोठा दिलासा आहे. त्यात कतरची भूमिका महत्वाची आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ