भेटीला 2 महिने पूर्ण होताच पुतिन यांची डोनाल्ड ट्रम्प यांना थेट धमकी, तर संबंध बिघडतील…
रशिया-युक्रेन युद्धाची झळ आता संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. त्यामध्येच जर युक्रेनची मागणी अमेरिकेने मान्य केली तर युद्ध अधिकच पेटण्याचे संकेत आहेत. त्यामध्येच आता रशियाने अमेरिकेने अत्यंत मोठा इशारा दिला आहे.

युक्रेन-रशिया युद्धात अमेरिकेने उडी घेतली असल्याने युद्ध अधिकच भडकताना दिसत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेला नुकताच मोठी धमकी दिली. अमेरिकेने जर युद्धादरम्यान युक्रेनला टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे पुरवली तर रशियासोबतचे त्यांचे संबंध बिघडतील. युक्रेनने अमेरिकेकडे टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे मागितली आहेत. ती देण्याचा विचारही अमेरिका करत आहे. रशियाने स्पष्ट म्हटले की, जर युक्रेनला टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे अमेरिकेने दिली तर रशियाचे मोठे नुकसान होईल आणि संबंध अधिकच तणावात येतील. रशिया आपली सुरक्षा करण्यासाठी सक्षम आहे, जर अमेरिकेने टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे दिली जरी रशिया आपली सुरक्षा करेल. मात्र, पुढील परिणामांसाठीही तयार राहावे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांची भेट अलास्कामध्ये दोन महिन्यांपूर्वीच झाली. भेटीनंतर पुतिन यांनी परत अमेरिकेला इशारा दिला. जर अमेरिकेने युक्रेनला ही क्षेपणास्त्रे दिली तर 44 महिने हे युद्ध चालेल. युक्रेनने अनेकदा घातल शस्त्रांची मागणी अमेरिकेकडे केली आहे. मात्र, अमेरिकेने अशी शस्त्र युक्रेनला दिली नाहीत. मात्र, यावेळी रशियावर दबाव टाकण्यासाठी अमेरिका ही शस्त्रे देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जातंय.
जर हे टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्र अमेरिकेने युक्रेनला दिले तर युक्रेन सर्वात अगोदर रशियाच्या तेल प्लंटला टार्गेट करेल आणि रशियाचे मोठे नुकसान होईल. क्रूझ क्षेपणास्त्रांच्या खरेदीमुळे युक्रेनियन सैन्याला रशियाच्या आत खोलवर अचूक हल्ले करणे शक्य होईल आणि रशियाच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांमुळे युद्धाची तीव्रता आणखी वाढेल. यामुळे हे युद्ध अधिकच भडकण्याचे दाट संकेत आहेत. अमेरिकेच्या भूमिकेकडे जगाच्या नजरा आहेत.
पुढील वर्षासाठी रशियन शस्त्रास्त्रांची संख्या मर्यादित करण्याचे आश्वासन दिले. यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी पुतिन यांच्या भूमिकेचे कौतुक केले आणि लवकरच यावर चर्चा केली जाईल असे सांगितले. त्यामध्येच आता मोठा डाव युक्रेनने खेळला आहे. नाटो देश रशियावर आरोप करताना दिसत आहेत. रशिया हा नाटो देशांची हवाई हद्द वापरत असल्याचा आरोप रशियावर सातत्याने केला जात आहे.
