AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला, 100 हून अधिक…

रशियाने काल रात्री युक्रेनमधील नागरी भागांवर भीषण हल्ला केला आहे. रशियन हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोठी बातमी! रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला, 100 हून अधिक...
putin and zelensky
| Updated on: Jul 07, 2025 | 11:04 PM
Share

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध भडकले आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. रशियाने काल रात्री युक्रेनमधील नागरी भागांवर भीषण हल्ला केला आहे. रशियाने युक्रेनच्या दिशेने 100 हून अधिक ड्रोन डागले होते, रशियाच्या या हल्ल्यामध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये 3 मुलांसह 38 जण जखमी झाले आहेत. तसेच गेल्या 24 तासांत रशियन हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रशियाचा आक्रमक पवित्रा

गेल्या काही दिवसांपासून रशियाने युक्रेनच्या नागरी भागांवरील हवाई हल्ले वाढवले ​​आहेत. त्यामुळे युक्रेनमधील मृतांची संख्या वाढायला लागली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर सुमारे 1270 ड्रोन, 39 क्षेपणास्त्रे आणि सुमारे 1000 शक्तिशाली ग्लाइड बॉम्बने हल्ला केला. तसेच रशियन सैन्य काही ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र युक्रेनियन सैन्याकडून त्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे.

रशियाकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला

रशियाने 4 जुलै रोजी युक्रेनची राजधानी कीववर सर्वात मोठा हवाई हल्ला केला होता. रशियाच्या या हल्ल्यात 23 जण जखमी झाले. या भीषण हल्ल्यामुळे कीवच्या अनेक भागांचे मोठे नुकसान झाले होते. रशियाने युक्रेनवर 550 ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले होत. यातील बहुतेक हल्ले शाहिद ड्रोनने केले होते, तर 11 क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यात आले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात युद्धबंदीबाबत झालेल्या चर्चेनंतर काही तासांतच हा हल्ला झाला होता.

युक्रेनकडूनही प्रत्युत्तर

रशियाच्या भीषण हल्ल्यांनंतर युक्रेननेही मॉस्कोवर हल्ला केल्याचा दावा केला होता. युक्रेनने म्हटले होते की, आमच्या सैन्याने रशियाच्या व्होरोनेझ प्रदेशात असलेल्या बोरिसोग्लेब्स्क एअरबेसवर हल्ला केला आहे. हा एअरबेस एक महत्वाचा एअरबेस आहे. रशियाच्या एसयू-34, एसयू35 एस आणि एसयू-30 एसएम लढाऊ विमानांचा मुख्य तळ आहे, मात्र यात रशियाचे किती नुकसान झाले याची माहिती समोर आलेली नाही.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.