Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर करणार मोठा हल्ला! कीव शहर तत्काळ रिकामं करा, रशियन संरक्षणमंत्र्यांचा इशारा

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलंय की, रशियाविरोधात माहिती दडपण्याच्या कारणामुळे कीवमध्ये 72व्या 'मेन सेंटर ऑफ इन्फोर्मेशन सायकोलॉजिकल ऑपरेशन' आणि यूक्रेनच्या सुरक्षा सेवा सुविधेवर हल्ला करणार आहे. या इमारतींच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी घराबाहेर पडण्याची सूचना रशियाने केलीय.

Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर करणार मोठा हल्ला! कीव शहर तत्काळ रिकामं करा, रशियन संरक्षणमंत्र्यांचा इशारा
रशिया कीव शहरावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 9:43 PM

नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेनच्या युद्धाबाबत (Russia Ukraine War) एक चिंताजनक बातमी आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने (Russia Defense Ministry) जाहीर केलंय की, रशियाविरोधात माहिती दडपण्याच्या कारणामुळे कीवमध्ये 72व्या ‘मेन सेंटर ऑफ इन्फोर्मेशन सायकोलॉजिकल ऑपरेशन’ आणि यूक्रेनच्या सुरक्षा सेवा सुविधेवर हल्ला करणार आहे. या इमारतींच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी घराबाहेर पडण्याची सूचना रशियाने केलीय. रशियाने (Russia) मंगळवारीही यूक्रेनमधील अनेक देशांवर बॉम्बवर्षाव सुरुच ठेवलाय. रशियन सैन्याने यूक्रेनमधील सर्वात मोठं शहर खार्किवच्या सेंटरवर हल्ला केलाय. या हल्ल्यामुळं सोव्हियत काळातील प्रादेशिक प्रशासन इमारतीचं मोठं नुकसान झालंय.

घटनास्थळावरील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार उद्ध्वस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 6 मृतदेह मिळाले आहेत. खार्किव विभाग प्रशासनाचे प्रमुख ओलेह सिनेहुबोव यांनी सांगितलं की रशियाने खार्किवच्या मध्यभागी असलेल्या रहिवासी इमारतीसोबत प्रशासकीय इमारतीवर मंगळवारी गोळीबार केला. यापूर्वी सोमवारी झालेल्या गोळीबारात कमीत कमी 11 लोकांचा मृत्यू झाला होता तर असंख्य लोक जखमी झाले होते. यूक्रेनचे सैन्य 14 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात घुसण्यापासून रशियन सैन्याला रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सिनेहुबोव यांनी सांगितलं.

खार्किवमध्ये जोरदार लढाई सुरु

यूक्रेनचे राष्ट्रपती वोलदिमीर जेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाने खार्किव शहरातील एका सेंट्रल स्क्वेअरवर मिसाईल हल्ला केलाय. हा एक निर्विवाद दहशतवाद असल्याचं म्हटलंय. तसंच जेलेन्स्की म्हणाले की, कुणीही माफ करणार नाही, कुणी विसरणार नाही. दरम्यान, सध्या रशियन सैन्य आणि यूक्रेनच्या सैन्यात खार्किव शहरात जोरदार लढाई सुरु आहे. हे शहर रशियाच्या सीमेपासून 40 किमी दुर आहे. अशावेळी या शहरावर रशियन सैन्य हल्ला करणार हे सुरुवातीपासूनच सांगितलं जात होतं.

यूरोपियन यूनियनमध्ये जेलेन्स्की यांना स्टॅन्डिंग ओवेशन

यूक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी मंगळवारी यूरोपीय यूनियनमध्ये संबोधित केलं. आपल्या संबोधनात दरम्यान जेलेन्स्की भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या संबोधनात जेलेन्स्की म्हणाले की स्वत:ला यूरोपियन यूनियनमध्ये पाहून आनंद झाला. आपल्याला इथं येण्यासाठी एवढी किंमत मोजावी लागेल हा विचार केला नव्हता. रशिया आमच्या रहिवासी भागाला निशाणा बनवतोय. आम्ही हजारो यूक्रेनी नागरिकांना गमावलं आहे, अशी खंत जेलेन्स्की यांनी व्यक्त केलीय. महत्वाची बाब म्हणजे यूरोपियन यूनियनमध्ये जेलेन्स्की यांना संबोधनानंतर स्टॅन्डिंग ओवेशन मिळाली.

इतर बातम्या :

Russia Ukraine War : यूक्रेन यूरोपिनय यूनियनचा सदस्य बनणार; यूरोपीय संसदेने स्वीकारला जेलेन्स्कींचा अर्ज

‘आमचा लढा आमची भूमी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी!’ यूरोपियन यूनियनमध्ये जेलेन्स्की यांना स्टॅन्डिंग ओवेशन

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.