AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता ‘धर्म’ संकट ! भारताने लाथ घालताच सौदीनेही दाखवली औकात, सौदी सरकारने घेतला मोठा निर्णय

सौदी अरेबियाने 2025 च्या हज यात्रेसाठी पाकिस्तानी खासगी यात्रेकरूंच्या संख्येत मोठी कपात केली आहे. 67,000 हून अधिक यात्रेकरूंना परवानगी नाकारण्यात आली आहे, ज्यामुळे पाकिस्तानात मोठे संकट निर्माण झाले आहे. सौदीच्या या निर्णयाने पाकिस्तान सरकार आणि यात्रेकरूंमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

आता 'धर्म' संकट ! भारताने लाथ घालताच सौदीनेही दाखवली औकात, सौदी सरकारने घेतला मोठा निर्णय
Saudi Arabia Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 28, 2025 | 11:32 AM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली. त्यानंतर पाकिस्तानच्या मित्र देशांनी हातवर करून ठेंगा दाखवला. त्यामुळे चोहोबाजूने नाकेबंदी झालेल्या पाकिस्तानला इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आता सौदी अरबनेही पाकिस्तानला औकात दाखवली आहे. सौदी अरब सरकार हज यात्रेच्या तयारीला लागली आहे. सौदी अरबने एक असा निर्णय घेतला आहे, त्यावरून ते कमीत कमी पाकिस्तानी नागरिकांना हजला येण्याची परवानगी देणार आहेत. सौदीने अनेक पाकिस्तानी नागरिकांची यात्रा रोखली आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर नवीन धर्म संकट उभं राहिलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 67 हजाराहून अधिक खासगी पाकिस्तानी हज यात्रेसाठी सौदीला जाऊ शकणार नाहीत. पाकिस्तानकडून हज यात्रेसाठी पहिली खेप पाठवली जाणार होती. त्यापूर्वीच सौदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. इस्लामाबादहून सौदी अरबसाठी पहिली हज फ्लाइट 29 एप्रिल रोजी रवाना होणार आहे. पाकिस्तानच्या हज 2025ची ही सुरुवात असणार होती.

खासगी यात्रेकरूंच्या पदरी निराशा

या वर्षी प्रायव्हेट प्रोग्रामच्या अंतर्गत 67,210 पाकिस्तानी नागरिक हज यात्रेला जाऊ शकणार नाहीत. या योजनेअंतर्गत एकूण 90,830 यात्रेकरू हज यात्रेला जाणार होते. पण सौदी सरकारने 23,620 यात्रेकरूंनाच हजला जाण्याची परवानगी दिली आहे. 67,210 यात्रेकरूंना परवानगी नाकारण्यात आली आहे. सौदी सरकारच्या मते, 2025मध्ये केवळ 26 टक्के पाकिस्तानी खासगी यात्रेकरूंना हजला येण्याची संधी दिली जाणार आहे. याचा अर्थ प्रत्येक चार यात्रेकरूंपैकी तीन पाकिस्तानी यात्रेकरू हजला जाऊ शकणार नाहीत.

पाकिस्तानी पंतप्रधानांची बेइज्जती

सूत्रोंच्या माहितीनुसार, या प्रकरणी पाकिस्तानी पंतप्रधानांनी एक चौकशी समिती स्थापन केली होती. पण त्यात काहीच प्रगती झालेली दिसत नाही. हज 2025साठीच्या यात्रेकरूंसाठी कोणतीही खास सवलत मिळालेली नाही, असं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता 67,210 खासगी यात्रेकरूंचं काय होणार? याचं उत्तर पाकिस्तानकडे नाहीये.

29 ला पहिलं उड्डाण

पाकिस्तानचं हजसाठीचं पहिलं उड्डाण इस्लमाबादहून होणार आहे. 29 एप्रिल रोजी हे उड्डाण होईल. पण यावेळी फक्त 393 यात्रेकरू हजला जाणार आहेत.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.