डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिडीओने जगभरात खळबळ, पुतिन यांच्या भेटीदरम्यान तब्बल 10 वेळा..
US President Donald Trump Shocking Video : डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात बैठक झाली असून अनेक महत्वाच्या मुद्दांवर या बैठकीत चर्चा झाली आहे. मात्र, या बैठकीदरम्यानचा डोनाल्ड ट्रम्प यांचा एक धक्कादायक असा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. ज्यानंतर खळबळ उडाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची बैठक झाली असून या बैठकीत काय होणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. सध्या भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेलेले असतानाच ही बैठक पार पडलीये. रशियाकडून भारत तेल खरेदी करतो ही ट्रम्प यांची समस्या आहे. या तेल खरेदीमुळेच अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ कर लावलाय. भारत अमेरिकेपुढे झुकला नसून अटी मान्य केल्या नाहीत. मात्र, असे असतानाही अमेरिकेकडून भारतावर दबाव टाकला जातोय. आता डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीदरम्यानचा धक्कादायक असा व्हिडीओ व्हायरल होतोय.
डोनाल्ड ट्रम्प हे ज्यावेळी पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचले त्यावेळी रेड कार्पेटवर ते व्यवस्थित चालू शकत नव्हते. चालताना त्यांचे अनेकदा तोल जात होते. हेच नाही तर रेड कार्पेटवरून खाली उतरताना देखील ते दिसले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला सांभाळून परत रेड कार्पेटवर आले. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, रेड कार्पेटवरून चालताना डोनाल्ड ट्रम्प यांचे तोल जात होते. डोनाल्ड ट्रम्प यांना अशाप्रकारे चालताना पाहून सर्वांनाच धक्का बसला.
डोनाल्ड ट्रम्प हे पुतिन यांना घेण्यासाठी रेड कार्पेटवरून जाताना दिसले. यावेळी त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हते आणि त्यांचे तोल जात होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या व्हायरल व्हिडीओनंतर विविध चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळतं. विशेष म्हणजे सेम त्याच रेड कार्पेटवर अगदी व्यवस्थित चालताना पुतिन हे दिसले. यामुळे रेड कार्पेटवर डोनाल्ड ट्रम्प असे का चालत होते याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
Trump struggled to walk in a straight line as he went to greet Putin pic.twitter.com/bCbJnlZMgB
— MeidasTouch (@MeidasTouch) August 15, 2025
अनेकांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी दारू घेतली असावी, त्यामुळेच त्यांना चालण्यात इतक्या जास्त समस्या निर्माण होत आहेत. त्याच सेम ठिकाणाहून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पुतिन व्यवस्थित चालत आहेत. खरोकरच पुतिन यांच्यासोबतच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना दारूचे सेवन केले होते का हा प्रश्न निर्माण झालाय.
