पाकिस्तानचा मित्र भारताला S-400 देणार? दोघांच्या वादात तिसऱ्याचा फायदा, पाकिस्तानला धक्का देत..
S-400 प्रणाली गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. रशियाकडून भारताला ही प्रणाली मिळाली असून ऑपरेशन सिंदूरमध्ये S-400 ची ताकद बघायला मिळाली. भारताला ही प्रणाली रशियाकडून मिळाली आहे.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि तुर्कीतील मैत्री चांगलीच वाढल्याचे बघायला मिळतंय. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणावात तुर्कीनेच मध्यस्थी केली होती. गेल्या काही दिवसांपासून असा दावा केला जात आहे की, तुर्कीने रशियन क्षेपणास्त्र प्रणाली तिसऱ्या देशाला म्हणजेच भारताला देण्याचा विचार केला आहे. तुर्कीच्या या S-400 वर मागील काही दिवसांपासून पाकिस्तानच्या नजरा आहेत. मात्र, पाकिस्तानला न देता भारताला देण्याच्या विचारत आहेत. अमेरिकेसोबतचा तणाव कमी करण्यासाठी आणि तुर्कीला F-35 कार्यक्रमात परतण्याची परवानगी देण्यासाठी हे केले जात आहे. मात्र, तुर्कीने हे दावे फेटाळून लावली.
तुर्किए टुडे या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात लष्करी सूत्रांच्या माहितीने म्हटले की, S-400 प्रणाली कोणत्याही देशाला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुर्की कोणत्याही परिस्थितीत S-400 हस्तांतरित करण्याचा विचार करत नाही. अमेरिकेचे राजदूत टॉम बराक यांनी सांगितले होते की S-400 चा प्रश्न पुढील वर्षीपर्यंत सोडवला जाऊ शकतो. त्यामुळेच तुर्की हे भारताला देण्याच्या तयारीत असल्याचे गुप्त सुत्रांचे म्हणणे आहे.
तुर्कीच्या S-400 प्रणालीवर मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचा डोळा आहे. आता भारत पाकिस्तानला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून थेट भारताला S-400 प्रणाली मिळू शकते. अमेरिकेचे राजदूत टॉम बराक यांच्या विधानाने असे सांगितले गेले की, तुर्की कदाचित तिसऱ्या देशाला S-400 पुरवण्यास तयार आहे. भारतीय माध्यमांमधील काही वृत्तांतात असेही म्हटले आहे की, ही प्रणाली भारतात पाठवली जाऊ शकते.
जर खरोखरच ही प्रणाली भारताला मिळाली तर पाकिस्तानचा जळफळाट उठेल. काही अहवालांमध्ये थेट भारताचा उल्लेख करण्यात आला आहे. तुर्की भारताला S-400 प्रणाली देऊ शकतो, असे सांगण्यात आले. कारण भारत आधीच रशियाच्या S-400 चा वापर करतो. रशियाला भीती होती की नाटो त्यांचे रडार कोड समजून घेऊ शकेल. त्यांनी भारताला तीच हवाई संरक्षण प्रणाली दिली जी ते स्वतः वापरतात. तुर्कीची प्रणाली भारतासाठी फार काही उपयुक्त ठरणार नाही.
