मंगळ ग्रहावर जाताना अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास मृतदेहाचं काय करतात? वाचा …

prajwal dhage

|

Updated on: Apr 17, 2021 | 6:38 PM

अंतराळ प्रवासातच अंतराळवीरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. अशावेळी या मृतदेहाचं काय होतं असं प्रश्न अनेकांना पडतो. त्याचाच हा सविस्तर रिपोर्ट. (space accident mars mission)

मंगळ ग्रहावर जाताना अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास मृतदेहाचं काय करतात? वाचा ...
SPACE MISSION

Follow us on

वॉशिंग्टन : मनुष्याच्या इतिहासात सध्या इतर ग्रहांवर जीवनाचं अस्तित्व शोधण्याचा सर्वात महत्वाचा टप्पा आलाय. त्याचाच भाग म्हणून मंगळावर आता रोबोटनंतर थेट अंतराळवीरांना पाठवण्याची तयारी सुरू आहे. यात नासा (NASA) सह टेस्ला (Tesla) आणि इतर देशांच्या संस्थांचा समावेश आहे. असं असलं तरी या मोहिमांमध्ये प्रवासातच अंतराळवीरांचे मृत्यू झाल्याच्याही घटना घडतात. अशावेळी या मृतदेहाचं काय होतं असं प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नाच्या अनुषंगाने हा आढावा… (Space Accident possibility while Human Mission to Mars)

आतापर्यंत अंतराळ यानात (Spaceship) बसून प्रवास करताना एकूण 21 जणांचा मृत्यू झालाय. आतातर थेट मंगळावर माणसं पाठवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे यात अंतराळवीरांच्या मृत्यूचाही धोका आहे. अशावेळी या अंतराळवीरांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार होतात का? आणि झाले तर कसे होतात हा महत्वाचा प्रश्न आहे. (Space Accident possibility while Human Mission to Mars).

मृतदेहाची वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्था

मंगळग्रहावर जाण्यासाठी अंतराळ वीरांना 7 महिने एका स्पेस कॅप्सूलमध्ये राहावं लागणार आहे. असा प्रवास करणारे ते पहिले ठरणार आहेत. ते सुरक्षित मंगळावर पोहचले तर त्यांना तेथील विपरीत वातावरणाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या दरम्यान दुर्दैवाने कुणाचा मृत्यू झाल्यास तो मृतदेह पृथ्वीवर येण्यासाठी अनेक महिने लागतील. त्यामुळे तशा पद्धतीने मृतदेह पाठवला जात नाही. त्याऐवजी या मृतदेहाची वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्था केली जाते.

मृतदेहावर अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या पद्धती

अंतराळ तज्ज्ञांनी मृतदेहावर कशाप्रकारे अंतिम संस्कार करावेत याच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत. त्यात ‘जेटिसन’चाही समावेश आहे. या पद्धतीप्रमाणे तो मृतदेह अंतराळातच सोडून दिला जातो. याशिवाय मृतदेह मंगळावर पुरण्याचाही पर्याय आहे. मात्र, पुरण्याआधी तो जाळणे महत्वाचं आहे.

मृतदेह खाऊन जिवंत राहा

दुसरीकडे खूप कठीण परिस्थितीत जीवन मरणाचा प्रश्न तयार झालेला असताना एक कठोर पर्याय देखील सुचवण्यात आलाय. अंतराळ मोहिमेत अन्न संपल्याच्या स्थितीत कुणाचा मृत्यू झाल्यास इतरांना तो मृतदेह खाऊन जिवंत राहता येण्याबाबत देखील सुचवण्यात आलंय.

अंतराळातील मृत्यूबाबत नासाकडून कोणतेही मार्गदर्शन तत्वे नाहीत

असं असलं तरी नासाकडून अंतराळात मृत्यू झाल्यास काय करावं याच्या स्पष्ट सूचना तयार करण्यात आलेल्या नाहीत. याचा निर्णय त्या मोहिमेतील टीमने करावा इतकंच स्पष्ट करण्यात आलंय. या प्रमाणे तो मृतदेह एखाद्या स्पेस कॅप्सूलमध्ये ठेऊन फ्रिज केला जातो.याशिवाय मृतदेह आहे तसाच अंतराळात सोडून देण्याचाही पर्याय आहे.

इतर बातम्या :

राजपक्षे सरकारनं श्रीलंका चीनला विकल्याचा आरोप, जनता बंडाच्या तयारीत; समजून घ्या संपूर्ण प्रकरण

कोरोनाचा प्रसार हवेतून वेगाने, मेडिकल जर्नल लॅन्सेटचा पुराव्यांसह दावा

पाकिस्तानमध्ये मदरशात शिकणाऱ्या मुलींचं मौलानाकडूनच लैंगिक शोषण, अश्लील व्हिडीओही रेकॉर्ड

(Space Accident possibility while Human Mission to Mars)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI