शाळेच्या भिंती रंगल्या रक्ताने; निष्पाप जीवांच्या कत्तलींचा खच…

काबुलमधील बॉम्बस्फोटात 53 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 46 मुली आणि महिलांचाही समावेश आहे.

शाळेच्या भिंती रंगल्या रक्ताने; निष्पाप जीवांच्या कत्तलींचा खच...
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 9:06 PM

काबूलः अफगाणिस्तान (Afghanistan)पुन्हा एकदा बॉम्बस्फोटामुळे हादरले आहे. पश्चिम काबूलमधील शाहिद माजरी रोडवर असणाऱ्या एका शाळेत बॉम्बस्फोट ( bombblast) झाला. या बॉम्बस्फोटात 53 जणांचा मृत्यू (student killed) झाला असून त्यामध्ये 46 मुली आणि महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार काबूलमधील एका शाळेत हा आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये 30 सप्टेंबर रोजीही स्फोट झाला होता.

त्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये बहुतांशी हे विद्यार्थीच होते. मात्र या हल्ल्यामध्ये 53 जणांनी आपला जीव गमवावला असून त्यामध्ये 46 मुलींचा आणि महिलांचा समावेश आहे. तर 110 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

काबूलमधील शिया भागातील एका शाळेवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला असल्याचे एपीकडून सांगण्यात आले आहे.

शहराच्या पश्चिमेला असलेल्या दश्त-ए-बरची भागातील काझ एज्युकेशन सेंटरमध्ये हा स्फोट झाला आहे. हा हल्ला झाला तेव्हा वर्ग खचाखच भरला होता. बॉम्बस्फोट झाल्यानंतर मृतदेहांच्या चिंध्या उडून गेल्या होत्या.

या घटनेनंतरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये रक्ताने माखलेल्या पीडितांना रुग्णालयात घेऊन जात असतानाचे चित्र दिसत आहे.

यावेळी पोलीस प्रवक्त्याकडून सांगण्यात आले की, या कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थी आणि मुली हायस्कूलच्या पदवीची तयारी करत होते.

अफगाणिस्तानमधील शाळा अनेकदा शुक्रवारी बंद असतात. हा स्फोट झाल्यानंतर अजून पर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. शाळेतील अनेक विद्यार्थी जखमी झाले असून ठार झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटणेही अवघड झाले आहे.

Non Stop LIVE Update
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.