Explained : डेड हँडला अमेरिका इतकी घाबरलीय की, आता थेट रशियाच्या सीमेवर पाठवलं ‘स्निफर’… असं काय खास आहे यात?
रशियाच्या फक्त डेड हँडच्या एका इशाऱ्याला अमेरिका इतकी घाबरलीय की, त्यांनी थेट रशियन बॉर्डरपर्यंत ‘स्निफर' पाठवलं. या स्निफरमध्ये असं काय खास आहे?. युक्रेनवरुन अमेरिका-रशियामध्ये तणाव न्यूक्लियर धमकी पर्यंत जाऊन पोहोचलाय. COBRA29 नावावरुन या स्निफर विमानाला ओळखण्यात आलं.

रशियाच्या न्यूक्लियर धमकीनंतर अमेरिका आता Active झाला आहे. आधी रशियाविरोधात दोन सबमरीन तैनात करण्याची घोषणा केली. आता रशियाच्या सीमेपर्यंत आपलं स्निफर विमान पाठवलं. या विमानाला अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आलय की अणवस्त्र ढिगाऱ्यापासून तयार झालेले ढग शोधून काढण्याची या विमानाची क्षमता आहे. फ्लाइट रडारकडून मिळालेल्या डाटानुसार या अमेरिकी स्निफर विमानाने रशियाच्या अणवस्त्र प्रकल्पांजवळ दिवसभर उड्डाण केलं. युक्रेनवरुन अमेरिका-रशियामध्ये तणाव न्यूक्लियर धमकी पर्यंत जाऊन पोहोचलाय. रशियाचे माजी राष्ट्रपती मेदवेदेव यांच्या डेड हँडच्या धमकीनंतर भडकलेल्या ट्रम्प यांनी दोन सबमरीन तैनात करण्याचे आदेश दिले.
आता एक टेहळणी विमान रशियाच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचलय. फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म फ्लाइटरडार 24 नुसार, अमेरिकन एअरफोर्सच्या या WC-135R विमानाने इंग्लंडमधील ब्रिटिश बेस आरएएफ मिल्डेनहॉलवरुन उड्डाण केलं. नॉर्वेच्या पश्चिम किनाऱ्यावरुन हे विमान उत्तरेकडे गेलं. COBRA29 नावावरुन या स्निफर विमानाला ओळखण्यात आलं. 14 तासांनी हे विमान ब्रिटनला परतलं. पण त्याआधी या विमानाने बेरेंट्स समुद्र, मरमंस्कच्या उत्तरेला आणि नोवाया जेमल्याची माहिती गोळा केली.
कोणाच्या वक्तव्यामुळे न्यूक्लियर सबमरीन तैनातीचा निर्णय
नुकताच रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोशल मीडियावर शाब्दीक वाद झाला. मेदवेदेव यांनी ट्रम्पना डेड हँडची भिती दाखवली. सोवियत संघाच हे असं शस्त्र होतं, अणवस्त्र हल्ल्याची स्थिती आल्यास ते आपोआप Active व्हायचं. मेदवेदेव यांच्या वक्तव्यानंतर ट्रम्प यांनी न्यूक्लियर सबमरीन तैनात करण्याचा निर्णय घेतला.
रशियाचे अणवस्त्र बेस कुठे?
युरोपसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने मरमांस्क आणि आसपासच्या भागात अणवस्त्र बेस बनवले आहेत. हा भाग नाटो देश नार्वे आणि फिनलँडच्या सीमेला लागून आहे. रशियाने आधीच इथे नौदलाचे आणि रणनितीक एअर बेस बनवून ठेवले आहेत. यात मॉस्कोच्या शक्तिशाली उत्तरी ताफ्यासाठी विमानतळ आहेत.
काहीच गुपचूप करता येत नाही
WC-135R विमान वातावरणातील डेटा एकत्र करतं. 1963 सालची अणवस्त्र प्रसारबंदी कायम आहे की नाही ते शोधून काढण्यासाठी हे विमान बनवण्यात आलं आहे. अमेरिका, सोवियत संघ आणि ब्रिटनमध्ये झालेल्या करारानुसार, वातावरणात अणवस्त्र चाचणीवर प्रतिबंध आहेत. हे विमान अणवस्त्र ढिगाऱ्यापासून तयार होणाऱ्या ढगांचा शोध घेण्यासाठी बनवण्यात आलं आहे. कुठल्या देशाने गुपचूप चाचणी केली, तर त्याची माहिती मिळावी हा त्यामागे उद्देश आहे. आतापर्यंत अमेरिका-ब्रिटनने मिळून रशियाच्या सीमेपर्यंत अनेकदा हे विमान पाठवलं आहे.
एअर डिफेंस सिस्टमवर मात करण्याची या मिसाइलची क्षमता
रशिया लवकरच नोवाया जेमल्या स्थित प्रक्षेपण स्थळावर 9M730 बुरेवेस्टनिक अणूऊर्जेवर चालणाऱ्या क्रूज मिसाइलची टेस्ट करु शकतो. न्यूजवीकच्या एका रिपोर्टनुसार, नाटो देशांमध्ये ही मिसाइल स्काईफॉल नावाने ओळखली जाते. ही मिसाइल अणू ऊर्जेवर संचालित आहे. अणवस्त्र वाहून नेण्यास ही मिसाइल सक्षम आहे. कुठल्याही देशाच्या एअर डिफेंस सिस्टमवर मात करण्याची या मिसाइलची क्षमता आहे. स्निफरच उड्डाण रशियाच्या संभाव्य मिसाइल चाचणीशी संबंधित होतं, असं सीएनए थिंक टँकचे विश्लेषक डेकर एवेलेथ यांनी लिहिलय.
किती अणवस्त्र चाचण्या वातावरणात झाल्यात?
अमेरिकेची संस्था आर्म्स कंट्रोल असोसिएशननुसार, मागच्या दशकभरात बहुतांश अणवस्त्र चाचण्या भूमिगत पार पडल्या आहेत. असोसिएशननुसार, 1963 च्या करारामुळे वातावरणातील अणवस्त्र चाचण्या बंद झाल्या. आर्म्स कंट्रोल असोसिएशननुसार, एकूण 528 अणवस्त्र चाचण्या वातावरणात झाल्या. त्यातून किरणोत्सारी पदार्थ पसरले.
अमेरिकेने आधी माघार घेतली
1987 साली अमेरिकेचे राष्ट्रपती रोनाल्ड रीगन आणि सोवियत संघाचे नेता मिखाइल गोर्बाचेव यांनी एका करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानुसार, 500 ते 5,500 किलोमीटर अंतरापर्यंत मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर प्रतिबंध लावण्यात आला. अमेरिकेने 2019 साली या कारातून माघार घेतली. त्यासाठी मॉस्कोवर क्रूज मिसाइल विकसित केल्याचा आरोप केला.
रशियाने काय म्हटलेलं?
अमेरिकेप्रमाणे नाटोनेही रशियावर कराराच उल्लंघन केल्याचाआरोप केला होता. मॉस्कोने या आरोपांच खंडन केलं होतं. अमेरिका करत नाही, तो पर्यंत आम्ही प्रतिबंधित मिसाइल्सची तैनाती करणार नाही असं रशियाने म्हटलं होतं.
