AMRAAM Missile : जगातल्या 19 देशांना हेच मिसाइल हवंय, स्टॉक वेगाने संपतोय, असं काय खास आहे या क्षेपणास्त्रात?
AMRAAM Missile : जगात एका खास मिसाइलला मोठी मागणी आहे. तब्बल 19 देशांना हेच मिसाइल हवय. महत्त्वाचं म्हणजे या मिसाइलचा स्टॉक संपत चाललाय. या मिसाइलमध्ये असं काय खास आहे? जाणून घ्या.

पेंटागनने 19 देशांसोबत 3.5 अब्ज डॉलरचा करार केला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सौदा आहे. AIM-120 एडवांस्ड मीडियम-रेंज एअर-टू-एअर मिसाइल (AMRAAM) या देशांना दिलं जाणार आहे. ज्या देशांनी हे मिसाइल विकत घेण्याचा करार केलाय, त्यात इस्रायल, युक्रेन आणि ब्रिटन प्रमुख देश आहेत. जगभरात खासकरुन मध्य पूर्वेत तणाव वाढलेला असताना हा सौदा झाला आहे. सध्या या AMRAAM मिसाइल्सचा स्टॉक संपण्याच्या मार्गावर आहे.
हे मिसाइल अमेरिकेच्या प्रत्येक फायटर जेटमध्ये फिट करता येतं. बियॉन्ड-विजुअल-रेंज म्हणजे नजरेपलीकडचा लक्ष्यभेद करण्यासाठी हे मिसाइल डिझाईन करण्यात आलं आहे. पण हे NASAMS (नॅशनल एडवांस्ड सर्फेस-टू-एयर मिसाइल सिस्टिम) म्हणजे जमिनीवरुन मारा करणाऱ्या मिसाइल सारखा सुद्धा याचा वापर सुरु आहे. NASAMS ला नॉर्वेची एक कंपनी Kongsberg आणि Raytheon ने मिळून बनवलं आहे. सध्या हे मिसाइल अमेरिकेला सुरक्षा प्रदान करतं तसच जगभरातील एक डझनपेक्षा जास्त देशात तैनात आहे. युक्रेन युद्धात मागच्या तीन वर्षांपासून या मिसाइल्सचा वापर होतोय.
कधी-कुठे ही मिसाइल्स वापरलीयत?
अमेरिकेने हुती बंडखोरांचे ड्रोन पाडण्यासाठी, सीरिया आणि इराकमध्ये ड्रोन हल्ले उधळून लावण्यासाठी आणि इराणच्या हल्ल्यापासून इस्रायलच रक्षण करण्यासाठी या मिसाइल्सचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. हे मिसाइल खराब हवामानापासून कुठल्याहीवेळी हल्ला करण्यासाठी सक्षम आहे. अलीकडेच अमेरिकेने इजिप्तला AMRAAM मिसाइल देण्याचा निर्णय घेतलाय. इजिप्तला त्यांच्याकडे असलेल्या F-16 फायटर जेट्समध्ये AIM-7 स्पॅरो आणि AIM-9 साइडवाइंडर मिसाइलवर काम चालवाव लागत होतं.
मिसाइल्सचा स्टॉक वेगाने संपत चाललाय
AIM-120 मिसाइलची निर्मिती वेगाने वाढवयाची गरज आहे. आतापर्यंत हजारो मिसाइल्सची निर्मिती झाली आहे. जवळपास 5,000 चाचण्या झाल्या आहेत. अलीकडच्या वर्षात अनेक आघाड्यांवर या मिसाइलचा वापर झालाय. त्यामुळे स्टॉक कमी झालाय. आता उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय. युक्रेन आणि मध्य पूर्वेतील सैन्य मोहिमांमळे या मिसाइल्सचा स्टॉक वेगाने संपत चाललाय.
