“राजकीय हिंसा सहन केली जाणार नाही”, निरोपाच्या भाषणात ट्रम्प यांचा इशारा

या व्हिडीओमध्ये ट्रम्प त्यांच्या कार्यकाळातील ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाच्या यशाबाबत बोलताना दिसत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:36 AM, 20 Jan 2021
"राजकीय हिंसा सहन केली जाणार नाही", निरोपाच्या भाषणात ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे (United States) नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आज (20 जानेवारी) त्यांच्या पदाची शपथ घेतील. बायडन यांच्या शपथ ग्रहण समारोहची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यापूर्वी अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump Farewell Speech) यांनी त्यांच्या निरोप भाषणाचा एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये ट्रम्प त्यांच्या कार्यकाळातील ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाच्या यशाबाबत बोलताना दिसत आहेत. तसेच, “आम्ही जी चळवळ सुरु केली, ती फक्त एक सुरुवात आहे”, असंही ते म्हणाले (Donald Trump Farewell Speech).

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटॉल भवनात झालेल्या हिंसेचाही या भाषणादरम्यान उल्लेख केला. हे अमेरिकेच्या मूल्यांविरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं. “कॅपिटॉल भवनवर झालेल्या हिंसेने प्रत्येक अमेरिकी नागरिक घाबरला होता. राजकीय हिंसा त्या सर्व मुल्यांवरील हल्ला आहे ज्या मुल्यांवर आपण जगतो. हे कधीही सहन केलं जाऊ शकत नाही. आता आम्हाला आधीपेक्षा जास्त एकत्र येण्याची गरज आहे”, असं ते म्हणाले.

‘चीनवर ऐतिहासिक व्यापार कर लावला’

“आम्ही चीनवर ऐतिहासिक व्यापार कर लावले, त्याशिवाय अनेक नवीन करार केले. आपलं व्यापारी धोरण वेगाने बदलले. त्यामुळे अमेरिकेला अरबो रुपये मिळाले. पण, विषाणूने आपल्याला दुसऱ्या दिशेने विचार करण्यास भाग पाडले”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

संभाव्य राजकीय भविष्याकडे लक्ष वेधून घेत ट्रम्प यांनी त्यांचं निरोप भाषण संपविले. “आता, मी एका नवीन प्रशासनाला जबाबदारी सोपवण्यच्या तयारीत आहे, मला माहित आहे की आपण जाणू इच्छित आहात की आम्ही सुरु केलेली चळवळ फक्त एक सुरुवात आहे”, असं म्हणत त्यांनी त्यांचं भाषण संपवलं (Donald Trump Farewell Speech).

निरोप भाषणात मेलानिया ट्रम्प काय म्हणाल्या?

फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनीही राष्ट्राला निरोप दिला. “नेहमी द्वेषावर प्रेम, हिंसाचारावर शांतता आणि इतरांना स्वत:च्या आधी निवडा” असं त्यांनी प्रत्येक अमेरिकन नागरिकाला सांगितलं.

राष्ट्राच्या प्रथम महिलेच्या रुपात सेवा करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता, असं म्हणत मेलानिया ट्रम्प यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “गेली चार वर्ष अविस्मरणीय होती. डोनाल्ड ट्रम्प आणि माझा व्हाईट हाऊसमधील कालावधी पूर्ण झाला आहे. अशावेळी मी त्या प्रत्येक व्यक्तीबाबत विचार करत आहे ज्यांना मी माझ्या मनात स्थान दिलं. त्याच्या प्रेमाची, देशप्रेमाची आणि दृढनिश्चयाची अविश्वसनीय किस्से माझ्या मनात आहेत”, असंही त्या म्हणाल्या.

Donald Trump Farewell Speech

संबंधित बातम्या : 

Donald Trump Impeachment | डोनाल्ड ट्रम्प: दुसऱ्यांदा महाभियोग, सर्वात बलाढ्य लोकशाहीतील सत्तापेच

Donald Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा चीनला अजून एक झटका, कोणता मोठा निर्णय?

US Capitol | संसदेचं रुपांतर छावणीत, 20 हजार जवान तैनात, जवानांवर जमिनीवर झोपण्याची वेळ