Donald Trump : हा तर माझ्या डाव्या हातचा मळ.. पाक-अफगाणिस्तान युद्धावरून ट्रम्प यांची दर्पोक्ती !
Donald Trump Pakistan Taliban War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पेटलेल्या युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा युद्धविरामाचा ज्वर चढला आहे. हे युद्ध थांबवणं, ते सोडवणं (माझ्यासाठी) खूप सोपं आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला.

Pakistan Afghanistan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान 48 तासांच्या सीझफायरची घोषणा झाली होती, मात्र आता ते तुटले आहे. दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. याचदरम्यान जगातील मि. सीझफायर अर्थात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील एंट्री घेतली आहे. नेहमीप्रमाणे, त्यांनी आपल्या युद्ध सोडवण्याच्या कौशल्याबद्दल सांगत म्हटले आहे की जर त्यांनी ठरवलं तर ते हे युद्ध क्षणार्धात सोडवू शकतात. ट्रम्प यांनी ही दर्पोक्ती केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना संघर्ष, युद्ध सोडवण्याची आवड आहे, हे सगळ्या जगाला माहीत आहे. जेव्हा जेव्हा जगातील एखादा देश दुसऱ्या देशाशी संघर्ष करतो तेव्हा डोनाल्ड ट्रम्प लगेच पांढरा झेंडा घेऊन येतात. अशा परिस्थितीत जेव्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लगेच पुढे आले. या दोन देशांमधले युद्ध थांबवणं आपल्यासाठी डाव्या हाताच मळ आहे, असे ट्रम्प ण्हणाले. कारण पाकिस्तानने अफगाणिस्तावर हल्ला का केला हे आपल्याला माहीत आहे असेही त्यांनी नमूद केलं.
युद्ध थांबवण्यात मजा येते !
शुक्रवारी पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले, “पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केला आहे हे मला माहित आहे, तरी ते सुरूच आहे. जर मी ते (युद्ध) सोडवायचे ठरवले तर ते माझ्यासाठी खूप सोपं आहे ” असं ते म्हणाले.
आपण जगभरातील अनेक युद्धं थांबवली आहेत, ज्यात भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचा देखील समावेश आहे, आपल्या या विधानाचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. याआधीही डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान अनेक वेळा केले आहे आणि आतापर्यंत आठ युद्धे सोडवल्याचा दावा त्यांनी केला आहे.ही यादी (युद्ध सोडवण्याची) त्यांना वाढवायची आहे.
नोबेलची तयारी सुरू
नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याच्या आशेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-इराण, इस्रायल-हमास आणि रशिया-युक्रेन युद्धांमध्येही भूमिका बजावली. याबदल्यात इस्रायलसह पाकिस्तानक़ूनही नोबेलसाठी त्यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. मात्र 2025 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा व्हेनेझुएलाच्या मारिया कॉर्निया मचाडो यांना मिळाला. त्यामुपळे ट्रम्प यांचा मोठा भ्रमनिरास झाला, त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी पडलं. मात्र त्यानंतरी नोबेल मिळवण्यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न सुरूच आहेत.
