अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्यावहिल्या भाषणाला ‘इंडियन टच’

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भाषणे ही व्हाईट हाऊसमधील स्पीच रायटिंग विभागाकडून लिहली जातात. | Joe Biden’s inaugural speech,

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:59 AM, 20 Jan 2021
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्यावहिल्या भाषणाला 'इंडियन टच'

वॉशिंग्टन: अनेक कायदेशीर वाद आणि अमेरिकेतील संसदेतील हिंसाचारानंतर अखेर जो बायडन (Joe Biden) हे बुधवारी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. यावेळी त्यांच्या पहिल्यावहिल्या भाषणाकडे (inaugural address) संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. हे भाषण लिहण्यात एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विनय रेड्डी (Vinay Reddy) असे त्यांचे नाव असून ते जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्यासाठी भाषण लिहून देण्याचे काम करतात. यापूर्वी राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या प्रचारावेळीही विनय रेड्डी यांनी या दोन्ही नेत्यांसाठी भाषणे लिहली होती. बराक ओबामा यांच्या काळातही विनय रेड्डी उपराष्ट्रपती असलेल्या जो बायडन यांचे प्रमुख भाषण लेखक होते. (Joe Biden will take charge of American President post)

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भाषणे ही व्हाईट हाऊसमधील स्पीच रायटिंग विभागाकडून लिहली जातात. सध्या जो बायडन यांच्यासाठी भाषण लिहण्याची मुख्य जबाबदारी माइक डोनिलॉन यांच्यावर आहे. ते दीर्घकाळापासून जो बायडन यांचे सल्लागार आहेत. याशिवाय, इतिहासतज्ज्ञ आणि चरित्रकार जो मॅकहॅम हेदेखील भाषण लेखनात मदत करतात.

विनय रेड्डी यांचे भारतीय कनेक्शन

विनय रेड्डी हे सध्या अमेरिकेत स्थायिक असले तरी त्यांचे मूळगाव हे तेलंगणात आहे. रेड्डी यांचे पूर्वज तेलंगणातील पोथिरेड्डीपेटा या गावात राहत होते. त्यानंतर ते अमेरिकेत गेले. विनय रेड्डी यांचा जन्म आणि शिक्षण अमेरिकेतच पूर्ण झाले आहे. विनय रेड्डी यांनी ओहायो आणि मियामी विद्यापीठांमधून शिक्षण घेतले आहे.

काय आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणांचा इतिहास?

जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या inaugural address च्या प्रथेला सुरुवात झाली. 30 एप्रिल 1789 रोजी जॉर्ज वॉशिंग्टन यांनी पहिल्यांदा अशाप्रकारचे भाषण दिले. यामध्ये स्वातंत्र्य आणि मुक्त सरकार अशा संकल्पनांचा समावेश होता. राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकीर्दीत 1793 लावी जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अवघ्या 135 शब्दांचे भाषण केले. हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे सर्वात लहान भाषण आहे. तर 1841 साली विल्यम हेन्री हॅरिसन यांनी केलेल्या भाषणात 8,455 शब्द होते. हे भाषण दोन तास सुरु होते.

संबंधित बातम्या : 

Donald Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा चीनला अजून एक झटका, कोणता मोठा निर्णय?

US Capitol | संसदेचं रुपांतर छावणीत, 20 हजार जवान तैनात, जवानांवर जमिनीवर झोपण्याची वेळ

“राजकीय हिंसा सहन केली जाणार नाही”, निरोपाच्या भाषणात ट्रम्प यांचा इशारा

(Joe Biden will take charge of American President post)