Video : ‘मला गोळी मारा, पण लोकांना जाऊ द्या’, म्यानमारमध्ये एका ननची लष्करी जवानांना विनंती

म्यानमारमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक नन गुडघ्यावर बसून लोकांना मारु नका अशी विनंती लष्करी जवानांना करताना दिसत आहे.

Video : 'मला गोळी मारा, पण लोकांना जाऊ द्या', म्यानमारमध्ये एका ननची लष्करी जवानांना विनंती
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 8:33 PM

नवी दिल्ली : मान्यमारमध्ये आंग सान सू की यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर तिथल्या लष्करानं नागरिकांवर अनन्वित अत्याचार सुरु केले आहेत. लष्कराला विरोध करणाऱ्या आंदोलकांना अटक केलं जात आहे. इतकंच नाही तर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून नागरिकांना ठार करण्याच्या घटनाही घडत आहेत. अशास्थितीत म्यानमारमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक नन गुडघ्यावर बसून लोकांना मारु नका अशी विनंती लष्करी जवानांना करताना दिसत आहे.(A nun in Myanmar urges army not to kill people)

‘मला मारा पण लोकांना सोडून द्या’

हा व्हिडीओ म्यानमारच्या मितकिना भागातील असल्याचं सांगितलं जात आहे. एक नन गुडघ्यांवर बसून मला मारा पण इथल्या लोकांना सोडून द्या, अशी विनंती ती जवानांना करत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या ननचं नाव एन रोज नू तवांग आहे. एन रोज नू तवांग ही नन लष्करी जवानांना लोकांना मारु नका, अशी विनंती करत असताना तिथे अजून एक नन येते आणि तिही जवानांना लोकांना सोडून देण्याची विनंती करत आहे.

लोकांना न मारण्याचं जवानांचं वचन

महत्वाची बाब म्हणजे जेव्हा ही नन गुडघ्यावर बसून लोकांना मारु नका अशी विनंती करत आहे. तेव्हा काही जवानही खाली बसून, हात जोडून ननसोबत बोलताना दिसत आहेत. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, “मी जवानांना विनंती केली की लोकांना मारु नका. त्यांना आपल्या परिवारातीलच एक समजा. जोपर्यंत लष्कराचे जवान लोकांना मारणार नाही असा विश्वास देत नाहीत, तोपर्यंत मी इथेच थांबणार” असं ती नन जवानांना बोलल्याचं सांगितलं जात आहे. शेवटी लष्कराचे जवान ननला वचन देतात की आम्ही लोकांना मारणार नाही, तर फक्त रस्ता रिकामा करण्याचं काम करतो.

म्यानमारमध्ये नेमकं काय घडलं?

म्यानमारमध्ये 8 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आँग सान सू ची यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल लील फॉर डेमॉक्रसी अर्थात NLD या पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं. सू ची यांच्या NLD या पक्षाला 476 पैकी तब्बल 396 जागा मिळाल्या. तर लष्कराने पाठिंबा दिलेल्या युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट या पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक निकालानंतर मतदार याद्यांमध्ये मोठी अफरातफर झाल्यानं असा निकाल लागल्याचा दावा म्यानमारच्या लष्करानं केला होता. मात्र, याबाबत कुठलेही पुरावे नसल्याचं सांगत म्यानमारच्या निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळून लावला होता. अशा परिस्थितीत आँग सान सू ची यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचं संसदीय सत्र 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार होतं. लष्कराने पुन्हा एकदा उठाव करुन संसदीय सत्र सुरु होण्यापूर्वीच देशाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत.

संबंधित बातम्या :

Special Story | म्यानमारमध्ये लोकशाहीला सुरुंग! लष्कराचा उठाव, भारतावर काय परिणाम?

26 वर्षांची हुकूमशाही ते एका महिलेनं आणलेली लोकशाही, पुन्हा सैन्यअधिपत्याखाली गेलेल्या म्यानमारची सगळी कहाणी!

म्यानमारमध्ये लष्कराच्या अत्याचारात 18 आंदोलकांचा मृत्यू, मात्र आंदोलन सुरुच

A nun in Myanmar urges army not to kill people

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.