AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: चीनचे भन्नाट एटीएम, सोने वितळवून 30 मिनिटांत खात्यात पैसे पोहचवते

चीनने एक अनोखे एटीएम मशिन विकसित केले असून त्यात सोने टाकले की ते त्या सोन्याची संपूर्ण किंमत ग्राहकाच्या बँकेत ट्रान्सफर करते.या एटीएमला प्रचंड पसंत केले जात आहे.

Viral Video: चीनचे भन्नाट एटीएम, सोने वितळवून 30 मिनिटांत खात्यात पैसे पोहचवते
gold melting ATM machine China
| Updated on: Apr 11, 2026 | 9:51 PM
Share

नेहमीच आधुनिक कल्पना मांडणाऱ्या चीनचे गोल्ड एटीएम मशिन सध्या चर्चेत आहे. हे एटीएम सोने विकण्याची प्रक्रिया एक सोपी आणि डिजिटल बनवते. या मशिनमध्ये लोक आपले सोने टाकतात, त्यानंतर मशिन हे सोने वितळवते आणि त्याची शुद्धता तपासते. सुमारे तीस मिनिटात या सोन्याची किंमत थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. Kinghood Group द्वारा तयार केलेली ही सोन्याची एटीएम मशिन कोणत्याही कागदी प्रक्रीयेशिवाय तुमचे सोन्याची किंमत तुम्हाला झटपट देते.वाढत्या सोन्याच्या किंमतीमुळे या मशिनला खूपच मागणी आहे. आणि स्लॉट आधीच बुक करावे लागत आहेत.

चीन टेक्नॉलॉजीचा नवा आविष्कार असलेल्या या चीनी गोल्ड एटीएम मशिनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की लोक आपले सोन्याचे दागिने या मशिनमध्ये टाकतात. त्यानंतर मशिन सोन्याला वितळवून त्याची शुद्धता तपासते आणि वजन करते. संपूर्ण प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक होते. तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्या सोन्याची किंमत थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होते. म्हणजे सोने विकण्यासाठी ज्वेलरकडे जाण्याची किंवा भाव करत बसण्याची प्रक्रिया करण्याची गरज पडत नाही.

कशी निश्चित होते किंमत ?

बातमीनुसार या एटीएमला Kinghood Group नावाची कंपनी संचालित करत आहे. मशिनीत सोने टाकण्यासाठी काही अटी देखील घातल्या आहेत. किमान तीन ग्रॅम सोने असायला हवे. त्याची शुद्धता ५० टक्क्यांहून अधिक हवी. जसे सोने मशिनमध्ये टाकले जाते.तसे ही मशिन त्या सोन्याला वितळवून त्याची वास्तविक गुणवत्ता आणि वजनाचे अचूक मोजमाप करते. संपूर्ण प्रक्रीयेला अर्धा तास लागतो. त्यानंतर निर्धारित रक्कम थेट बँकेच्या खात्यात पाठवली जाते.

या प्रक्रियेत कोणतीही कागदपत्रीय प्रक्रिया केली जात नाही. न ओळखपत्र दाखवण्याची गरज आहे. यामुळे प्रक्रिया सोपी आणि सुविधाजनक बनते. त्यामुळे लोक या नव्या सुविधेला पसंद करत आहेत. सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे या मशीनची लोकप्रियता वाढली आहे. अनेक लोक घरातील जुने आणि बेकार झालेले दागिने विकण्यासाठी या एटीएमचा वापर करत आहेत. पारंपारिक ज्वेलर्सच्या तुलनेत येथे पारदर्शकता अधिक आहे. आणि पैसे लागलीच मिळत आहेत. त्यामुळे या एटीएमला मागणी आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

एका डेमो दरम्यान हे देखील दाखवले गेले की ४० ग्रॅमची सोन्याची चेन यात टाकली. तर त्यास सुमारे ७८५ युआन प्रति ग्रॅमचे मुल्य मिळाले. यामुळे एकूण रक्कम ३६,००० युआन झाली. जे भारतीय चलनात ४.२ लाख रुपयांच्या बरोबर आहे. सर्वात खास बाब म्हणजे ही रक्कम केवळ अर्ध्या तासात थेट बँक खात्यात जमा होते.

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग