AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: ‘देवा श्री गणेशा’वर पाकिस्तानातील तरुणांनी धरला ठेका, कराचित थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव

Viral Video: पाकिस्तानातील कराची येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला आहे. संपूर्ण कराची शहर ‘गणपती बप्पा मोरया’ आणि ‘जयदेव-जयदेव’च्या जयघोषांनी दुमदुमले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे व्हिडीओ पाहून तुम्ही देखील चकीत व्हाल...

Viral Video: ‘देवा श्री गणेशा’वर पाकिस्तानातील तरुणांनी धरला ठेका, कराचित थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव
karachi ganesh-chaturthiImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 29, 2025 | 5:17 PM
Share

एकीकडे भारतात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2025) हा सण थाटामाटात साजरा होत आहे. सगळीकडे रोशनाई, मोठमोठे डेकॉरेशन, गणपतीच्या मूर्ती पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे भारताच्या शेजारील दुश्मन देश पाकिस्तानातही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली. पाकिस्तानातील कराची येथे राहणाऱ्या कोकणी मराठी समाजातील हिंदूंनी मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने बप्पांचे स्वागत केले. यावेळी संपूर्ण कराचीमध्ये ‘गणपती बप्पा मोरया’ आणि ‘जयदेव-जयदेव’च्या जयघोष सुरु होता. सोशल मीडियावर याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे, ज्याला पाहून भारतीय युजर्स खूप खुश झाले आहेत आणि पाकिस्तानी हिंदूंना (Pakistani Hindu) शुभेच्छा देत आहेत.

काय आहे व्हिडीओ?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओजमध्ये कराचीतील रत्नेश्वर महादेव मंदिर, गणेश मठ आणि स्वामीनारायण मंदिरात विशेष पूजा-अर्चना आणि सांस्कृतिक कार्यक्रम दाखवण्यात आले आहेत. व्हिडीओमध्ये पारंपरिक गाण्यांची झलक पाहायला मिळते.

वाचा: वाल्मिक कराडने तुरुंगात मागितलेली ती मशीन थेट बिग बॉस १९च्या घरात, नेमकं कारण तरी काय?

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये कराचीतील स्वामीनारायण मंदिरात हिंदू तरुणांच्या एका गटाला बॉलिवूड चित्रपट ‘अग्निपथ’मधील ‘देवा श्री गणेशा’ गाण्यावर पूर्ण जोशात नाचताना पाहायला मिळत आहे.

नेटकऱ्यांनी केले कौतुक

हे मनमोहक व्हिडीओ पाकिस्तानातील इन्स्टाग्राम युजर्स @vikash_vada आणि @aariyadhanwani यांनी शेअर केले आहे. या व्हिडीओंनी नेटकऱ्यांचे विशेषत: भारतीयांचे मन जिंकले आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी मनापासून प्रेम व्यक्त करत आहेत. एका युजरने कमेंट केली, “अल्लाह तुम्हाला नेहमी सुखी ठेवो.” दुसऱ्या युजरने लिहिले, “अशीच एकता कायम ठेवा. तुम्हाला श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.” एका पाकिस्तानी युजरने लिहिले, “मला पाकिस्तानी हिंदू असल्याचा अभिमान आहे. मी पाकिस्तानातील शाहदरामधून आहे.”

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.