AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुतीन यांनी मंत्र्याला पदावरून हटवलं, काही तासांनंतर आढळला मृतदेह

रशियातील महत्वाच्या नेत्याचा मृतदेह आढळला असल्याची बातमी समोर आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढले होते, त्यांनंतर त्यांचा मृतदेह आढळला आहे.

पुतीन यांनी मंत्र्याला पदावरून हटवलं, काही तासांनंतर आढळला मृतदेह
Roman Starovoit
| Updated on: Jul 07, 2025 | 9:11 PM
Share

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या दोन देशांकडे लागले आहे. अशातच आता रशियातील महत्वाचे नेते रोमन स्टारोवोइट यांचा मृतदेह आढळला असल्याची बातमी समोर आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळातून काढले होते, त्यानंतर अवघ्या 3 तासांनंतर त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

रोमन स्टारोवोइट हे रशियन सरकारमधील वाहतूक विभागाचे प्रमुख होते. स्टारोवोइट यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. रशियन स्थानिक माध्यमांनी स्टारोवोइट यांचा मृतदेह सोमवारी त्यांना मंत्रीपदावरून काढून टाकल्यानंतर 3 तासांनी त्यांच्या घरात आढळला असल्याचे सांगितले आहे. तसेच स्टारोवोइट यांनी आत्महत्या केली असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

टेलिग्राम 112 ने दिलेल्या माहितीनुसार, स्टारोवोइट यांच्या मृतदेहाजवळ एक बंदूक सापडली आहे. त्यानंतर रशियाच्या आपत्कालीन सेवांमधील एका सूत्राने स्टारोवोइट यांच्या मृत्यूच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. मात्र ही हत्या की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेले नाही.

एक वर्षापूर्वी बनले होते मंत्री

व्लादिमीर पुतीन यांनी स्टारोवोइट यांना एक वर्षापूर्वी वाहतूक मंत्री बनवले होते. त्यांना आधी उपपरिवहन मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आणि नंतर ते वाहतूक मंत्री बनले होते. मात्र परंतु कामातील निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. आंद्रेई निकितिन हे रशियाचे नवे वाहतूक मंत्री बनले आहेत. मात्र मंत्रिपद गेल्यानंतर अवघ्या 3 तासांत त्यांचा मृतदेह आढळला आहे.

स्टारोव्होइट रस्ते बांधणीत हुशार होते

रोमन स्टारोव्होइट हे रस्ते बांधणीत हुशार होते, त्यांनी रशियामध्ये रस्त्यांचे जाळे बांधले होते. ते 2012 ते 2018 पर्यंत फेडरल रोड एजन्सीचे प्रभारी होते. त्यानंतर ते कुर्स्क प्रदेशाचे राज्यपाल देखील बनले होते. स्टारोव्होइट राज्यपाल असताना युक्रेनने रशियातील कुर्स्क ताब्यात घेतले होते, त्यामुळे पुतीन नाराज झाले होते अशी माहिती समोर आली आहे.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.