AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | जे कोणाला जमत नाहीय, ते रशिया इस्रायलसाठी करु शकेल का?

Israel-Hamas War | इस्रायल आणि हमासमध्ये घनघोर युद्ध सुरु आहे. रशियाने पॅलेस्टाइनची बाजू घेतलीय. पण आता इस्रायलला याच रशियाची मदत घ्यावी लागत आहे. गाझा पट्टीत युद्धामुळे मोठ नुकसान झालय. हमासचे अनेक तळ नष्ट करण्यात आले आहेत. जगभरात या युद्धाविरोधात निदर्शन सुरु आहेत.

Israel-Hamas War | जे कोणाला जमत नाहीय, ते रशिया इस्रायलसाठी करु शकेल का?
Israel-hamas war Russia
| Updated on: Oct 21, 2023 | 1:46 PM
Share

जेरुसलेम : हमासने एकाचवेळी 5 हजार रॉकेट डागून इस्रायलवर हल्ला केला. यात 1400 पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. शेकडो जखमी झाले. हमासच्या दहशतवाद्यांनी काही इस्रायली नागरिकांना बंधक बनवलं व त्यांना सोबत गाझा पट्टीत घेऊन गेले. त्यानंतर इस्रायलने पलटवार केला. गाझा पट्टीवर सतत हवाई हल्ले सुरु आहेत. हमासचे तळ नष्ट केले जातायत. अनेक इमारतींचा ढिगारा झालाय. आता इस्रायलने आपल्या बंधकांना सोडवण्यासाठी रशियाकडे मोर्चा वळवला आहे. इस्रायलला रशियाची मदत हवी आहे.

बंधकांच्या सुटकेसाठी इस्रायलची रशियाशी चर्चा सुरु आहे. हमासच्या ताब्यात 203 इस्रायली नागिरक आहेत. इस्रायल एकाबाजूला ग्राऊंड ऑपरेशन कधीही सुरु करेल अशी धमकी देतोय, त्याचवेळी पडद्यमागे रशियाशी चर्चा सुरु आहे. दोन अमेरिकन नागरिकांना सोडल्याची माहिती हमासने दिलीय. आई आणि मुलीची हमासकडून सुटका करण्यात आलीय.

अमेरिकन नेवीच हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर

एका बाजूला बंधकांना सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुसऱ्याबाजूला इस्रायलच्या सरंक्षण मंत्र्यांनी म्हटलय की. गाझामध्ये घुसून हमासला संपवू. मोठ्या प्रमाणात इस्रायली सैन्य, रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. सॅटलाइट फोटो समोर आलेत. आता या युद्धा अमेरिकेची एंट्री झाली आहे. अमेरिकन नौदल इस्रायलच्या शत्रूंना आपली ताकत दाखवत आहे. इस्रायलवर आता येमेनच्या हौती बंडखोरांनी हल्ला केला. पण लाल समुद्रात उपस्थित असलेल्या अमेरिकन नौदलाच्या युद्ध जहाजांनी हा हल्ला यशस्वी होऊ दिला नाही.

हमासचे 100 तळ नष्ट

इस्रायलचे गाझा पट्टीत हल्ले सुरु आहेत. 10 तासात हमासचे 100 तळ नष्ट करण्यात आले आहेत. शस्त्रास्त्रांचे डेपो आणि बंकरही नष्ट केलेत. इस्रायलच्या निशाण्यावर हमासचे बंकर आहेत. हमासने अशा 2500 बंकरचा वापर कारस्थान रचणं, लपण्यासाठी आणि स्वत:ला वाचवण्यासाठी केला. इस्रायलने आता बंकर्सना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या दौऱ्यानंतर इस्रायलने अधिक जोरदार हल्ले सुरु केलेत. तिसर सर्वात जुन चर्च उद्धवस्त

घातक एयरस्ट्राइकमध्ये दीर-अल-बलाह भागातील हमासच कार्यालय उडवण्यात आलं. त्याशिवाय इस्रायलच्या हल्ल्यात जगातील तिसर सर्वात जुन चर्च सेंट पोर्फिरियस उद्धवस्त झालं. IDF च्या हल्ल्यात हमासच्या नौदलाचा अमजद ओदेह मारला गेला. 7 ऑक्टोबरच्या नरसंहाराचा तो सुद्धा मास्टरमाइंड होता. त्यासोबतच नेवल कमांडर मबदुह अल-शलाबी आणि हमासचा दहशतवादी खालेद सबाह सुद्धा मारला गेला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.