AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्यावाचून पाक तडफडत असताना,सिंधु करारात चीनने नाक खुपसले, ड्रॅगनची मोठी चाल ?

सिंधू पाणी करारांतर्गत पाकला भारताकडून तीन प्रमुख नद्यांचे पाणी मिळते. पण पहलगाम हल्ल्यानंतर हा करारच रद्द केल्याने या पाणी पुरवठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो त्यामुळे पाकिस्तान निराशेने पछाडला आहे.

पाण्यावाचून पाक तडफडत असताना,सिंधु करारात चीनने नाक खुपसले, ड्रॅगनची मोठी चाल ?
narendra modi and xi jinping
| Updated on: Jul 16, 2025 | 6:09 PM
Share

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २४ निरपराध नागरिकांची निर्घृण हत्या झाली. त्यानंतर भारताने १९६० पासून चालु असलेला सिंधू जल वाटप करार रद्द केला.भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवले. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानच्या सीमेत शिरुन ९ अतिरेकी स्थळांना उद्धवस्थ केले.या सिंधू करारांतर्गत पाकिस्तानला तीन नद्यांचे पाणी मिळत होते. आता हा करारच रद्द झाल्याने पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सिंधु जल करारात हस्तक्षेप करु शकतो चीन

या दरम्यान आता चीनने देखील या मुद्द्यात नाक खुपसले आहे. कन्व्हरसेशनच्या एका बातमीनुसार चीन सिंधु जल वाटप करारात हस्तक्षेप करु शकतो. त्यामुळे या भागातील तणावात आणखी वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. भारताला भीती आहे की चीन त्याच्या सीमेतून भारतात वाहणाऱ्या नद्यांचा प्रवाहात अडथळा आणू शकतो. चीनी माध्यमांनी भारताला आक्रमक म्हणत पाण्याला हत्यार म्हणून वापर करण्याची शंका व्यक्त केली आहे. तसेच चीनने अशीही घोषणा केली आहे की तो सिंधूच्या सहायक नद्यांवर मोहम्मद डॅम प्रकल्पांना चालना देणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला फायदा होईल आणि भारतावरील रणनितीक दबाव वाढू शकतो.

भारतातील अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सिंधु जल वाटप कराराच्या अटी पाकिस्तानासाठी जास्तच उदारता दाखवत आहेत. सुमारे ६५ टक्के पाकिस्तानी लोकसंख्या सिंधु नदीच्या खोऱ्यात रहाते. तर भारताच्या बाजूला ही संख्या १४ टक्के आहे. त्यामुळे भारताच्या कठोर निर्णयाने पाकिस्तानला जास्त दु:ख झाले असून तो अडचणीत सापडला आहे.

पाकिस्तानच्या मदतीला धावला चीन

चीन आता स्वत:ला सिंधु जल वाटप करारातील एक महत्वाचा पक्षकार मानू लागला आहे. चीनी माध्यमांनी या प्रकरणात भारताला आक्रमक म्हणत जर पाण्याचा हत्यार म्हणून वापर केला तर याचे गंभीर परिणाम होतील असे चीनने म्हटले आहे. बातम्यांनुसार सिंधुनदीचा उगम क्षेत्र चीनच्या पश्चिमी तिबेट क्षेत्रात आहे. त्यामुळे हा वाद आणखीन संवेदनशील झाला आहे. याच सोबत चीनने घोषणा केली आहे की तो सिंधुच्या उपनद्यांवर मोहम्मंद हायड्रो प्रोजेक्ट वेगाने उभारणार आहे. हे पाऊल भारतासाठी एक मोठा इशारा म्हटले जात आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.