AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची अडवणूक करणाऱ्या अमेरिकेचे हाल, रशियाकडून अंडी विकत घेण्याची वेळ; असं काय घडलं?

अमेरिकेची परराष्ट्र नीति मागच्या काही महिन्यात डळमळीत झाल्याचं चित्र आहे. भारताशी मैत्रिपूर्ण संबंध असताना टॅरिफ लावला. रशियाकडून तेल आयात करत असल्याने हा कर लादला. त्यामुळे देशातील संबंध ताणले आहेत. असं असताना मागच्या 32 वर्षात अमेरिकेला पहिल्यांदाच रशियाकडून अंडी विकत घेण्याची वेळ आली आहे.

भारताची अडवणूक करणाऱ्या अमेरिकेचे हाल, रशियाकडून अंडी विकत घेण्याची वेळ; असं काय घडलं?
भारताला अडवणूक करणाऱ्या अमेरिकेचे हाल, रशियाकडून अंडी विकत घेण्याची वेळ; असं काय घडलं?Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 06, 2025 | 9:19 PM
Share

अमेरिकेत दुसऱ्यांदा ट्रम्प सरकार स्थापन झाल्यानंतर मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर इतर देशांवर टॅरिफचा धडाका लावला आहे. त्यामुळे इतर देशांच्या निर्यातीवर परिणाम झाला. अमेरिकेने भारतावरही 50 टक्के टॅरिफ लादला आहे. भारत रशियाकडून तेल आयात करतो हे कारण दिलं आणि 25 टक्क्यांवरून टॅरिफ 50 नेला. पण आता अमेरिकेवर रशियाकडून अंडी आयात करण्याची वेळ आली आहे. अमेरिकेवर अशी स्थिती 1992 नंतर म्हणजेच 32 वर्षानंतर ओढावली आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने आरआयए नोवोस्तीने ही माहिती दिली आहे. जुलै 2025 मध्ये अमेरिकेने रशियाकडून ताज्या कोंबडीच्या अंड्यांवर 4,55,000 डॉलर्स खर्च केले. रशियन सरकारी एजन्सीने त्यांच्या एक्स हँडलवरही ही माहिती शेअर केली. अमेरिकेत अंड्यांची कमतरता आणि वाढलेल्या किमतीमुळे हे पाऊल उचलणं भाग पडलं.

अमेरिकेत या वर्षाच्या सुरुवातीला एव्हियन फ्लूची साथ पसरली होती. त्यामुळे देशातील चिकन आणि अंड्याच्या साठ्यावर परिणाम झाला. यामुळे अंड्यांच्या किमती झपाट्याने वाढल्या. फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेत एक डझन अंड्यांची किंमत 7 अमेरिकन डॉलर इतकी होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 16.4 टक्क्यांनी अधिक होती. त्यामुळे अमेरिकेला अंडी आयात करण्याशिवाय पर्याय नव्हत्या. अमेरिकन अन्न बाजारात स्थिरता येण्यासाठी अजून सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे अमेरिकेने 32 वर्षानंतर हा पर्याय निवडला. एकीकडे भारत आयात करतो म्हणून निर्बंध लादायचे आणि दुसरीकडे पोळी शेकायची हे काही रुचलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर वाभाडे काढले जात आहेत.

रशियाने युक्रेनवर 2022 मध्ये हल्ला चढवला होता. तेव्हापासून आतापर्यंत युद्ध्यजन्य स्थिती कायम आहे. आता या युद्धाला तीन वर्ष होत आली आहेत. मात्र अजूनही काही तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे, अमेरिका आणि रशिया यांच्यातील व्यापारात लक्षणीय घट झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले. अमेरिकेने रशियाकडून तेल, वायू, कोळसा, सागरी उत्पादने आणि हिरे यासारख्या गोष्टींच्या आयातीवरही बंदी घातली आहे. पण अमेरिकेवरच रशियाकडून अंडी आयात करण्याची वेळ आली.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.