World News Bulletin: जगात काय घडतंय? पाकिस्तानमध्ये 100 वर्षापूर्वीच्या मंदिरावर हल्ला, वाचा 5 मोठ्या बातम्या

World News Bulletin: जगात काय घडतंय? पाकिस्तानमध्ये 100 वर्षापूर्वीच्या मंदिरावर हल्ला, वाचा 5 मोठ्या बातम्या

सोमवारी (29 मार्च) आशिया खंडासह जगभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यातील 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Mar 30, 2021 | 1:53 AM

Latest World News: सोमवारी (29 मार्च) आशिया खंडासह जगभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यातील 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा. यामध्ये पाकिस्तानमध्या 100 वर्षांपूर्वीच्या मंदिरावरील हल्ला, इजिप्तमधील (Egypt) सुएझ कालव्यातील सागरी वाहतूक, कोरोना विषाणूच्या (Corona Virus) उगमावर जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) अहवाल अशा महत्त्वाच्या 5 बातम्यांविषयी जाणून घेणार आहोत (World News Bulletin latest Top 5 World News Pakistan Suez Canal China WHO).

1. इजिप्तच्या सुएझ कालव्यातील महाकाय मालवाहतूक जहाज 6 दिवसांनंतर सोमवारी (29 मार्च) हटवण्यात यश आलं. त्यामुळे युरोप आणि आशियामधील ठप्प झालेली व्यापारी वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झालीय.

2. पाकिस्तानमधील रावळपिंडीमध्ये एका 100 वर्षांपूर्वीच्या हिंदू मंदिरावर अज्ञात लोकांनी हल्ला केलाय. या प्रकरणी पाकिस्तान पोलिसांनी तक्रार दाखल केलीय. या ठिकाणी 10 ते 15 लोकांनी मंदिरावर हा भ्याड हल्ला केला.

3. अमेरिकेतील अलास्कामध्ये एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं. यामध्ये चेक गणराज्याचे सर्वात श्रीमंत व्यक्ती पीटर केलनर यांचा मृत्यू झाला. पीटर यांचं नाव फोर्ब्सच्या 2020 च्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत होतं.

4. कोरोना विषाणूचा उगम आणि प्रसार कसा झाला यावर जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल प्रकाशित केलाय. यासाठी WHO चं एक पथक चीनलाही जाऊन आलं. यात कोरोना विषाणू कोणत्याही प्रयोगशाळेतून प्रसारित झाला नसून वटवाघूळापासून इतर प्राण्यांपर्यंत आणि तेथून माणसात आल्याचं सांगण्यात आलंय.

5. ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी इंग्लंडमध्ये कोविड-19 निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. तेथे कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यावेळी त्यांनी नागरिकांना बेजबाबदारपणे न वागण्याचंही आवाहन केलंय.

हेही वाचा :

चीनवर कोरोना पसरवल्याचा वारंवार आरोप, आता WHO च्या अहवालात मोठा खुलासा, ड्रॅगनची भूमिका काय?

Suez Canal : सुएझ कालव्यात अडकलेलं महाकाय जहाज अखेर हटवलं!

बॉयफ्रेंडची हत्या केल्याने तरुणीला जन्मठेपेची शिक्षा, मात्र ‘या’ कारणामुळे शेकडो महिला समर्थनासाठी रस्त्यावर

व्हिडीओ पाहा :

World News Bulletin latest Top 5 World News Pakistan Suez Canal China WHO

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें