वाह नशीब असावं तर असं, फोनची रिंग वाजली, कॉल पण रिसिव्ह केला नाही, अन् क्षणात महिला बनली कोट्यधीश
विचार करा, तुम्हाला एका ओळखीच्या नसलेल्या नंबरवरून कॉल येतो, तुम्ही तो कॉल उचलत देखील नाहीत, त्यानंतर तो मिस कॉल होतो आणि याच मिस कॉलमुळे तुम्ही मालामाल होतात, असंच एका महिलेसोबत घडलं आहे.

विचार करा, तुम्हाला एका ओळखीच्या नसलेल्या नंबरवरून कॉल येतो, तुम्ही तो कॉल उचलत देखील नाहीत, त्यानंतर तो मिस कॉल होतो आणि याच मिस कॉलमुळे तुम्ही मालामाल होतात, हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर? तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे एका महिलेच्या बाबतीमध्ये खरं ठरलं आहे, एका मिस कॉलमुळे या महिलेच्या बँक अकाउंटमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. नेमकं हे कसं घडलं, याबाबत जाणून घेऊयात, एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच ही घटना आहे.
या महिलेसोबत मोठा चमत्कार घडला आहे, आपल्यापैकी अनेक जण अनोळखी नंबर रिसिव्ह करत नाहीत, तसेच या महिलेनं देखील केलं. तिला एका अननोन नंबरवरून कॉल आला. तिने तो कॉल उचलला नाही, त्यामुळे तो नंबर तिच्या मोबाईलच्या स्क्रिनवर मिस कॉल म्हणून दिसत होता. त्यानंतर या महिलेची नजर तिला ज्या नंबरवरून कॉल आला होता, त्या नंबरच्या पहिल्या चार आकड्यांवर पडली, तेव्हा तिच्या डोक्यात एक विचार आला, की आपण या चार आकड्यांवरून लॉटरीचं एक तिकीट विकत घेऊ, त्या महिलेनं जसा विचार केला होता, त्याच प्रमाणे तिने तिकीट देखील घेतलं. तिच्यावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद होता, या महिलेनं घेतलेल्या तिकिटाला प्रथम क्रमांकाची लॉटरी लागाली.
ही घटना मलेशियामधील पेरेक राज्यातील आहे. ज्या पहिलेला लॉटरी लागली ती महिला मलेशियातील इपोह शहरात राहाते. या महिलेनं मलेशियात प्रसिद्ध असलेल्या Da Ma Cai 1+3D नावाच्या लॉटरीमध्ये तिला जो फोन आला होता त्या फोनच्या पहिल्या चार नंबरवर आपलं नशीब अजमावून बंघितलं आणि तिला त्याच नंबरवर तब्बल 1.4 मिलियन डॉलर अर्थात भारतीय रुपयांमध्ये 11.5 कोटी रुपयांचा जॅकपॉट हाती लागला आहे. जेव्हा या महिलेच्या खात्यात हे पैसे जमा झाले तेव्हा त्या महिलेला प्रचंड आनंद झाला, माझा अजूनही या गोष्टीवर विश्वस बसत नसल्याचं या महिलेनं म्हटलं आहे.
