AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीत एक घोट रम पिणे आरोग्यासाठी चांगले? तज्ज्ञांचे काय मत ?

थंडीत अनेक जण सर्दी पडसे झाल्यास एक चमचा रम किंवा ब्रँडी पिण्याचा सल्ला देत असतात. किंवा लहान मुलांना सर्दी-खोकला जाण्यासाठी एक चमचा ब्रंडी पाजण्याचा सल्ला दिला जात असतो. परंतू तज्ज्ञांचा यावर सल्ला काय आहे ?

थंडीत एक घोट रम पिणे आरोग्यासाठी चांगले? तज्ज्ञांचे काय मत ?
rum
| Updated on: Nov 21, 2025 | 9:04 PM
Share

मद्याचे सेवन आरोग्यासाठी खूपच नुकसान करणारे म्हटले जाते. परंतू थंडीत शरीरास गरम करण्यासाठी काहीजण कॅफीन ( चहा -कॉफी ) याशिवाय अल्कोहोलचा आसरा घेतात. मर्यादित घेतल्यास शरीरास याचा फायदा असतो असा तर्क हे लोक मानत असतात. तुम्ही ऐकले असेल की थोडीशी रम किंवा ब्रँडी थंडीत घेतल्याने शरीराला उब मिळते आणि सर्दी तसेच खोकला होत नाही. लहान मुलांना थंडीत खोकला सर्दी झाली तर चमचा भर ब्रँडी पाजण्याचा सल्ला दिला जात असतो. या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी बोललो त्यावेळी त्यांनी काय मत मांडले पाहूयात…

थंडीत जेव्हा तापमान घसरते तेव्हा तुम्हाला बाहेरुन स्वत:ला उब निर्माण करावी लागते आणि स्वत: गरम ठेवू सारे वाटते. आणि आतुन उष्णता येण्यासाठी गरम गुणधर्म असलेल्या वस्तू घेण्याचा सल्ला दिला जात असतो. त्यामुळे अनेकांचे अनेक गैरसमज असतात. त्यामुळे या लेखात पाहूयात की एक चमचा रम प्यायल्याने थंडीत उष्णता मिळते का ? तज्ज्ञाचे म्हणणे काय ? थंडीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.

थंडीत रम पिणे योग्य आहे का ?

फेलिक्स हॉस्पिटलचे सीएमडी डॉक्टर डी.के. गुप्ता यांच्या मते लोकांमध्ये गैरसमज आहे की दारु शरीराला गरम ठेवते. वास्तविक आपण रम किंवा कोणतेही मद्याचे सेवन करतो. तेव्हा रक्ताचा प्रवाह वेगाने वाहू लागतो. त्यामुळे काही वेळ शरीराला उष्णता वाटते. त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी लोक मद्याचा आसरा घेत असतात. परंतू वास्तवात याने शरीराचे कोर तापमान आणखी लवकर घसरते. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

होऊ शकते नुकसान

लोकांना वाटते थंडीत थोडीशी रम प्यायल्याने थंडीपासून वाचता येते किंवा सर्दी खोकला येत नाही तर परंतू यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. डॉक्टर गुप्ता यांच्या मते तर एक घोट रम घेतल्याने हळूहळू तुमची इम्युनिटी कमी होऊ लागते. शरीर डिहायड्रेट ( पाणी कमी होणे ) होऊ लागते. त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते. आणि मूड स्विंग होतो.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.