AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतराळात पाणी उकळल्यास बुडबुडे का येत नाहीत ? डोकं खाजवा, जरा विचार करा…

Bubbles Not Form In Space Boiling Water : अंतराळातील जग पृथ्वीपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. बऱ्याच लोकांना पृथ्वीवरून अंतराळात जाण्याची इच्छा असते, पण तिथे राहणं अतिशय आव्हानात्मक आहे.

अंतराळात पाणी उकळल्यास बुडबुडे का येत नाहीत ? डोकं खाजवा, जरा विचार करा...
अंतराळात उकळत्या पाण्यात बुडबुडे का तयार होत नाहीत ? Image Credit source: social media
| Updated on: Jul 17, 2025 | 9:52 AM
Share

शुभांशू शुक्ला हे नुकतेच स्पेस स्टेशनमधून परतले, संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे. अंतराळात जाणे आणि तिथे थोडा वेळ घालवणे हा विचार खूप छान वाटतो, पण जे अंतराळात जातात किंवा सध्या जात आहेत त्यांनाच यामागचं खरं आव्हान काय ते माहीत असतं, त्याची जाणीव असते. तिथे गेल्यावर रोजची, दैनंदिन कामं करणं देखील खूप कठीण होतं. अंतराळात नेहमीच काहीतरी नवीन शोध सुरू असतो, त्यामुळे अंतराळवीर पृथ्वीवरून नेहमीच तिथेजात राहतात. अशा परिस्थितीत, त्यांच्या अन्न आणि पेय या मूलभूत गरजा अवकाशात पूर्ण होतात. अवकाशात गुरुत्वाकर्षण शून्य असते, त्यामुळे तेथे खाणं-पिणं देखील कठीण असतं. त्याच अंतराळाबद्दल लोकांना अनेक प्रश्नही पडतात.

त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे अंतराळात पाणी उकळलं तर बुडबुडे का येत नाहीत ? चला याबद्दल जाणून घेऊया..

अंतराळात राहणं कठीण

अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांनी आतापर्यंत अवकाशाबद्दल अनेक रहस्ये उलगडली आहेत, त्या रहस्यांचा सामान्य माणूस पृथ्वीवर बसून कल्पनाही करू शकत नाही. अवकाशाचे जग विज्ञानकथांपेक्षाही आश्चर्यकारक आहे. पृथ्वीप्रमाणे अंतराळात गुरुत्वाकर्षणाचा कोणताही परिणाम होत नाही, म्हणूनच माणूस हवेत तरंगत राहतो. आणि जेव्हा तो बऱ्याच काळानंतर पृथ्वीवर परत येतो तेव्हा त्याला पुन्हा चालायला शिकावे लागते. तसंच जर अंतराळात पाणी उकळलं तर तो पृथ्वीपेक्षा पूर्णपणे वेगळा अनुभव असेल. जर आपण पृथ्वीवर असताना पाणी उकळलं तर लाखो बुडबुडे तयार होतात, परंतु अवकाशात असं घडत नाही.

पृथ्वीवर पाण्याचे बुडबुडे का होतात तयार ?

अंतराळात जेव्हा पाणी उकळले जाते तेव्हा तिथे हजारो बुडबुडे तयार होत नाहीत, तर फक्त एक मोठा बुडबुडा तयार होतो. तिथे गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे इतके बुडबुडे तयार होऊ शकत नाहीत, म्हणूनच बुडबुडे वर येऊ शकत नाहीत. पण गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर बुडबुडे तयार होतात. जेव्हा पृथ्वीवर पाणी उकळते तेव्हा उष्णतेमुळे पाण्याचे रेणू वेगाने हालचाल करतात. रेणूंमध्ये इतकी ऊर्जा जमा होते की ते द्रव स्थितीत राहू शकत नाहीत आणि पाण्याच्या वाफेचे वायू रेणू बनून पाण्यावर तरंगू शकत नाहीत. गुरुत्वाकर्षणामुळे हे बुडबुडे वर येताना दिसतात.

अंतराळात पाण्यात बुडबुडे का तयार होत नाहीत ?

अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे, बुडबुडे वरच्या दिशेने वर येऊ शकत नाहीत, म्हणून ते पाण्यातच राहतात आणि एका मोठ्या बुडबुड्यात विलीन होतात. हा बुडबुडा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत नाही, तर तो पाण्याच्या आतच राहतो. त्याच वेळी, पाण्याचा उत्कलन बिंदू (boiling point) देखील जा बदलतो आणि कमी दाबाने पाणी कमी तापमानात उकळू लागते. म्हणूनच अंतराळात पाणी उकळण्यासाठी कमी उष्णता लागते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.