अचानक आग लागल्यानंतर काय करावं? कोणाला, कधी, कसा संपर्क साधावा..?

अचानक आग लागल्यानंतर काय करावं? कोणाला, कधी, कसा संपर्क साधावा..?
अग्निशामक दल (संपादित छायाचित्र)

आपत्कालीन क्रमांक साहाय्यानं तुम्ही ऑन द स्पॉट फायर ब्रिगेड, मेडिकल आणि पोलिसांकडूनदेखील मदत मिळवू शकता. तुम्ही ज्या राज्यात आहात तेथील स्थानिक भाषेत बोलू शकता किंवा तुम्ही हिंदी इंग्रजी भाषेतून सुद्धा मदत मागू शकता...

प्रदीप गरड

|

Jan 24, 2022 | 4:16 PM

Fire Brigade Emergency Number : हल्ली आपण बर्‍याचदा ऐकतो कोणाच्या दुकानात, कोणाच्या घरात, कोणाच्या ऑफिसमध्ये आगीसारखी घटना घडली आहे. कधी गावातील घरांमध्ये आग तर कधी शहरातील एखाद्या इमारतीत आग (Fire Incident) लागण्यासारख्या घटना आपण ऐकत असतो. अशावेळी वेळेवर अग्निशामक दल पोहोचले तर वित्त हानी आणि जीवितहानी होण्याचं प्रमाण खूप कमी असू शकते. अग्निशामक दल (Fire Brigade) जेवढ्या लवकर पोहोचेल तेवढ्या लवकर त्या आगीवर नियंत्रण मिळवून नुकसान कमी होण्यास मदत (Help) होऊ शकेल.

घटनास्थळी तत्काळ पोहोचते टीम

अनेकदा आपल्या आसपास अशा आगीच्या घटना घडल्याचं आपण पाहत असतो. अशावेळी फायर ब्रिगेडची मदत आपण घेऊ शकतो. कोणत्या नंबरवर कॉल करावा, यासंबंधीची माहिती आपल्याला असेल तर अशा परिस्थितीत त्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो. हे तर आपल्याला माहितीच आहे की पोलिसांची मदत हवी असल्यास इमर्जन्सी नंबर असतो 100. या नंबरवर डायल केल्यानंतर आपल्याला पोलिसांची मदत मिळते. याच पद्धतीने फायरब्रिगेडची मदत हवी असल्यास आपल्याला 101 हा नंबर डायल करावा लागेल. आगीची घटना घडल्यानंतर 101 नंबरवर कॉल केल्यानंतर फायर ब्रिगेडची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचत असते.

इमर्जन्सी नंबर 112वर मिळेल तत्काळ मदत :

देशभरात आपत्कालीन परिस्थितीत त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एक देश एक आपत्कालीन नंबर(One nation One Emergency Number) 112 लॉन्च केला आहे. तुम्ही देशातील कोणत्याही भागातून हा नंबर डायल करून आपत्कालीन परिस्थितीत पोलीस, फायर ब्रिगेड आणि मेडिकल या प्रकारची कोणतीही मदत तुम्हाला मिळू शकते. ही सेवा 24 तास आणि आठवड्यातील सातही दिवस काम करते. आपत्कालीन नंबर 112 च्या द्वारे ऑन द स्पॉट फायर ब्रिगेड, मेडिकल आणि पोलीस तुमची मदत करू शकतात. तुम्ही ज्या राज्यात आहात तेथील स्थानिक भाषेचा अथवा इतर भाषेचा वापर करून तुम्ही बोलू शकता. हिंदी व इंग्रजी भाषेतही तुम्ही मदत मागू शकता.

जाणून घ्या इमर्जन्सी सेवेशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांची काही उत्तरं..

काय आहे 112 नंबर?

112 हा एक युनिव्हर्स आपत्कालिन नंबर आहे. जो इमर्जन्सी परिस्थिती असताना देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशा मधील लोक कॉल करून मदत मागू शकतात. या एका कॉलवर फायर ब्रिगेड, मेडिकल टीम अथवा पोलीस तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी पोहोचू शकतील. तुम्ही तुमच्या मोबाइलचा आणि फिक्स लँडलाईन नंबरवर कॉल करू शकता. या युनिव्हर्सल इमर्जन्सी नंबरवरती देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून मोफत कॉल करता येतो..

100 आणि 101 नंबरऐवजी 112ची गरज काय?

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांच्या मदतीसाठी 100हा नंबर पहिल्यापासून अस्तित्वात आहे तर दुसरीकडे आग लागण्याची घटना घडल्यास 101 नंबर तर अँब्युलन्ससाठी 102 नंबर डायल करून आपण विचारणा करू शकतो. 100 आणि 101 नंबर असताना सरकारने 112 नंबर संपूर्ण देशात आपत्कालीन नंबर सुरू केला आहे. याच्यामागे सगळ्यात मोठे कारण आहे की संपूर्ण जगात स्पेशलिटी यूएसए, कॅनडा आणि युरोपसारख्या देशांमध्ये आपत्कालीन सेवेसाठी 112 हाच नंबर वापरात आहे. अधिक तर मोबाइलमध्ये 112 नंबर इमर्जन्सी कॉल साठी फिट केलेला असतो हे लक्षात ठेवून ट्रायने 2015 मध्ये 112 नंबर इमर्जन्सी कॉल साठी अधिकृत केला आहे.

तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह आहे हा नंबर?

112 एक वैश्विक स्तरावर मान्यता मिळालेला नंबर आहे. जास्तीतजास्त मोबाईल्समध्ये प्री-प्रोग्राम्ड 112सोबत निर्मित केले जातात. ज्याला आपत्कालीन नंबर स्वरूपात सिंगल की प्रेस (Single Key Press) केले जाऊ शकते. ट्रॉयने मे 2015मध्ये भारतात सिंगल इमर्जन्सी नंबरच्या उद्देशाने हा नंबर ठरवला.

काय आहे इमरर्जन्सी बटण आणि हे 112सोबत कसे जोडले आहे?

भारत सरकारद्वारा प्रकाशित राजपत्रानुसार 1 जानेवारी 2017 (1 एप्रिल 2017पासून प्रभावी) पासून वापरल्या जाणाऱ्या स्मार्टफोनमध्ये पॅनिक बटनांची कार्यक्षमता असते. याला स्मार्टफोनमध्ये सतत तीन वेळा पावर बटन दाबून सक्रिय केले जाऊ शकते. तर दुसरीकडे फिचर फोनमध्ये सलग पाच किंवा नऊ अंक दाबल्यानंतर सक्रिय होईल पॅनिक बटन आपत्कालीन नंबर 112 सरळ जोडले गेले आहे.

काय आहे 112 टोल फ्री नंबर?

तुम्ही कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशांमधून तुमच्या मोबाईलमधून 112 आपत्कालीन नंबर डायल करून त्यावर कॉल करू शकता. याशिवाय मोबाइल ऑपरेटर नेटवर्क उपलब्ध नसल्यास सुद्धा तुम्ही 112 नंबरवर कॉल करू शकता.

काय 112च्या ऐवजी 101वर सुद्धा कॉल करू शकता?

तुम्ही देशात कुठेही असाल तिथून 112 नंबर डायल करू शकता. हा नंबर डायल केल्यानंतर कॉल तिथेच लागतो जिथे तुम्ही एकशे एक नंबर डायल केल्यानंतर कॉल लागतो. जेव्हा तुम्हाला फायर ब्रिगेड किंवा ॲम्ब्युलन्सची गरज असते. त्यावेळी तुम्ही 112 नंबर वर कॉल करता, जेव्हा तुम्हाला भारतात पोलिसांसाठी आपत्कालीन नंबर 112वर कॉल करता त्यावेळी आपत्कालीन नंबर 100 किंवा 101 या नंबरवर कॉल पाठवला जातो.

आग लागल्यानंतर सगळ्यात आधी सुरक्षेची कोणती पावलं उचलायला हवीत? जाणून घ्या सर्वकाही!

रेल्वे आपलीच म्हणून मोठ्यानं गप्पा मारताना जरा सावध बरं का, नियम वाचा… नाही तर कारवाई होऊ शकते!

भविष्यात एंटीबायोटिक सुध्दा ठरणार फेल? जग आणखीन एका महामारीच्या दिशेने चाललंय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें