AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेड प्रमोशनशिवाय युट्यूब चॅनल बनवा लोकप्रिय! फक्त ‘या’ ट्रिक्स वापरा

युट्यूब चॅनल चालू केलं की सुरुवातीला प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो पण योग्य प्लॅनिंग, चांगलं कंटेंट, स्मार्ट प्रमोशन आणि प्रेक्षकांशी प्रामाणिक संवाद ठेवल्यास पेड प्रमोशनशिवायही युट्यूबवर यशस्वी होता येतं. फक्त संयम आणि सातत्याची गरज असते. त्यामुळे या टीप्स फॉलो करा आणि चॅनल चुटकीत फेमस करा.

पेड प्रमोशनशिवाय युट्यूब चॅनल बनवा लोकप्रिय! फक्त 'या' ट्रिक्स वापरा
youtube
| Edited By: | Updated on: Jun 13, 2025 | 1:21 PM
Share

सध्याच्या डिजिटल युगात युट्यूब हे केवळ मनोरंजनाचेच नव्हे तर करिअर आणि कमाईचे प्रभावी माध्यम बनले आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात बहुतांश क्रिएटर्सना व्ह्यूज आणि सबस्क्राइबर वाढवण्यात मोठा संघर्ष करावा लागतो. पेड प्रमोशनसाठी पैसे खर्च करण्याऐवजी काही स्मार्ट आणि प्रभावी टिप्स वापरून तुम्ही नैसर्गिकरीत्या तुमच्या चॅनलची लोकप्रियता वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही प्रभावी युक्त्या.

1. थंबनेल आणि टायटल ठरवतो यशाचा पहिला टप्पा

प्रत्येक युजरला तुमच्या व्हिडिओवर क्लिक करण्यासाठी सर्वात आधी आकर्षक थंबनेल आणि टायटल दिसतो. त्यामुळे थंबनेलमध्ये मोठ्या फॉन्टमध्ये मजकूर, आकर्षक एक्सप्रेशन्स आणि उच्च दर्जाचे इमेजेस वापरा. टायटलमध्ये कुतूहल निर्माण करा पण अतिशयोक्ती किंवा clickbait पासून टाळा. उदाहरणार्थ, “३ दिवसांत १० हजार सबस्क्राइबर मिळवण्याचा माझा गुपित फॉर्म्युला” असा टायटल आकर्षक ठरतो.

2. योग्य कीवर्डचा वापर करा

युट्यूब हे एक प्रकारचे सर्च इंजिन असल्याने टायटल, डिस्क्रिप्शन आणि टॅग्समध्ये प्रेक्षक शोधत असलेले कीवर्ड वापरणं खूप महत्त्वाचं असतं. यासाठी Google Trends किंवा TubeBuddy सारख्या टूल्सचा वापर करून ट्रेंडिंग कीवर्ड शोधा. डिस्क्रिप्शनमध्ये २-३ वेळा हे कीवर्ड समाविष्ट करा आणि टॅग्समध्येही तुमच्या विषयाशी संबंधित शब्दांचा समावेश करा.

3. तुमच्या Niche च्या कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा

तुमच्या विषयाशी संबंधित इतर युट्यूब चॅनल्सचे व्हिडिओ बघा, त्यावर कमेंट करा, कंटेंट शेअर करा. यामुळे त्या कम्युनिटीमध्ये तुमचं नाव तयार होईल आणि नवीन प्रेक्षक तुमच्या चॅनलकडे आकर्षित होतील. शिवाय, प्रेक्षकांशी कमेंटद्वारे संवाद साधा, पोल घ्या, कम्युनिटी टॅबमध्ये सक्रिय रहा.

4. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करा

तुमचे व्हिडिओ Facebook ग्रुप्स, Telegram चॅनेल्स, WhatsApp ग्रुप्स, Reddit आणि Quora यांसारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करा. मात्र हे करताना स्पॅमिंग टाळा. केवळ त्या ग्रुप्समध्ये शेअर करा जिथे लोक तुमच्या विषयाशी संबंधित माहिती शोधतात.

5. सातत्य ठेवा आणि वेळेचं नियोजन करा

युट्यूबवर नियमितता हे यशाचं गमक आहे. आठवड्यातून किमान एक व्हिडिओ ठराविक दिवशी आणि वेळेला अपलोड करा. यामुळे प्रेक्षकांना तुमच्या व्हिडिओची सवय लागते आणि ते दरवेळी नवीन कंटेंटची वाट बघतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.