AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 6 टिप्सच्या मदतीने मुलांच्या डिजिटल ॲक्टिव्हिटीवर ठेवा लक्ष, प्रत्येक पालकांसाठी ठरेल उपयुक्त

इंटरनेट आणि एआयने जग बदलून टाकले आहे. आता आपण फक्त काही बोटांच्या टॅपने घरबसल्या जगाची माहिती मिळवू शकतो. त्यातच मुले इंटरनेटवर काय पाहत आहेत यावर लक्ष ठेवणे प्रत्येक पालकांसाठी महत्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या 6 टिप्स जाणून घेऊयात जे पालकांसाठी फायदेशीर ठरेल.

'या' 6 टिप्सच्या मदतीने मुलांच्या डिजिटल ॲक्टिव्हिटीवर ठेवा लक्ष, प्रत्येक पालकांसाठी ठरेल उपयुक्त
| Edited By: | Updated on: Sep 08, 2025 | 10:40 PM
Share

आजचा युग हा डिजिटल युग आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मुलांच्या जीवनावर होत आहे. ऑनलाइन क्लासेस, मनोरंजन, सोशल नेटवर्किंग साईट आणि गेमिंगमुळे मुलांचे जग स्क्रीनपुरते मर्यादित झाले आहे. अशा परिस्थितीत मुले इंटरनेटवर काय पाहत आहेत, विशेषतः लहान मुलं यावर लक्ष ठेवणे पालकांसाठी महत्त्वाचे आहे.

मुलांच्या डिजिटल ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवल्याने त्यांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवता येते आणि चांगल्या प्रकारे मुलांना इंटनेटचा वापर कसा करावा हे सांगता येते. मुलांच्या डिजिटल ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणे हे हेरगिरी नसून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मार्गदर्शनासाठी ते महत्त्वाचे आहे. मुलांच्या डिजिटल ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवता येईल अशा काही टिप्स आज आपण जाणून घेऊयात.

मुलांशी मोकळेपणाने बोला

पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे तुमच्या मुलाशी मोकळेपणाने बोलणे. त्यांना समजावून सांगा की इंटरनेटचे फायदे आणि तोटे दोन्ही काय आहेत. ते ऑनलाइन काय करतात, कोणत्या प्रकारचे गेम खेळतात आणि कोणते अ‍ॅप्स वापरतात ते त्यांना विचारा. त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करा जेणेकरून कोणत्याही समस्येच्या बाबतीत ते तुमच्याशी थेट बोलू शकतील.

पेरेंटल नियंत्रण ॲप्स

आजकाल अनेक पेरेंटल कंट्रोल ॲप्स आणि सॉफ्टवेअर विकसित केले गेले आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात. या ॲप्सच्या मदतीने तुम्ही स्क्रीन टाइम मर्यादा सेट करू शकता. तसेच याच्या मदतीने धोकादायक वेबसाइट ब्लॉक करू शकता, तसेच मुलं कोणते अॅप्स वापरत आहेत यावर लक्ष ठेवू शकता.

मोबाईल डिव्हाइस वावर असलेल्या ठिकाणी ठेवा

मुलांच्या खोलीत जाऊन लॅपटॉप, टॅब्लेट किंवा स्मार्टफोन वापरण्याऐवजी घरातील जास्त वावर असलेल्या ठिकाणी जसे की हॉलमध्ये किंवा डाइनिंग टेबलवर फोनचा वापर करा. यामुळे मुलांच्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणे सोपे होते आणि ते अनुचित गोष्टी पाहणे देखील टाळतात.

डिजिटल गोष्टी शिकून घ्या

जर तुम्हाला स्वतःला सोशल मीडिया किंवा ऑनलाइन गेमबद्दल माहिती नसेल, तर तुमच्या मुलाच्या ॲक्टिव्हिटी समजून घेणे तुमच्यासाठी कठीण होईल. मूलभूत डिजिटल साक्षरता शिका . तसेच, मुलांना ऑनलाइन गोपनीयता, सायबरबुलिंग आणि हॅकिंग सारख्या धोक्यांबद्दल जागरूक करा. त्यांना पासवर्डचे महत्त्व समजावून सांगा आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलू नका हे देखील सांगा.

तुमच्या मुलांचे मित्र बना

जर तुमचे मूल सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असेल तर त्यांना तुमचे मित्र किंवा फॉलोअर बनण्यास सांगा. पण मुलांच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट देऊ नका किंवा त्यांना पब्लिकली कमेंट करू नका याची खात्री पालकांनी ठेवली पाहिजे. यांचा उद्देश फक्त मुलांच्या सोशल मीडियावरील गोष्टींवर लक्ष ठेवणे आहे.

नियम बनवा आणि तडजोड करा

घरी डिजिटल उपकरणांच्या वापरासाठी स्पष्ट नियम बनवा. जेवताना फोन नको, शाळेचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत स्क्रीन टाइम नको, रात्रीच्या वेळी ठराविक वेळेनंतर सर्व मोबाईल व इतर उपकरणं खोलीत ठेवावीत.

Follow Us
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा