‘मराठी भाषा दिना’ची जाणून घ्या सविस्तर माहिती, हिंदीनंतर कोणत्या क्रमांकावर..

मराठी भाषा दिन संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाला मोठे महत्व नक्कीच आहे. मराठी भाषेचा इतिहास हा अत्यंत प्राचीन आणि मोठी आहे. उद्या राज्यभरात मराठी भाषा दिन साजरा केला जाईल. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

'मराठी भाषा दिना'ची जाणून घ्या सविस्तर माहिती, हिंदीनंतर कोणत्या क्रमांकावर..
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 8:47 PM

मुंबई : 27 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण राज्यात ‘मराठी भाषा दिन‘ म्हणून साजरा केला जातोय. या दिवसाला मोठे महत्व आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण राज्यात हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवसाला खूप जास्त महत्व आहे. ठिकठिकाणी मराठी भाषा दिवसाचे कार्यक्रम ठेवले जातात. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तर विद्यार्थी हे मराठी भाषा दिवसावर भाषणे देखील करतात.

तसा मराठी भाषेचा इतिहास हा खूप जास्त जुना आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मराठी हीच भाषा बोलली जाते. मुळात म्हणजे आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक मिळून 800 भाषा बोलतात. आपल्या देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी आहे. 2011 मध्ये एक सर्वे करण्यात आला. या सर्वेमधून मोठी आणि महत्वाची माहिती ही पुढे आली.

सर्वेनुसार देशातील 45 टक्के लोक हे हिंदी भाषा बोलतात. दुसऱ्या नंबरवर बंगाली भाषा आहे तर तिसऱ्या नंबरवर मराठी भाषा आहे. म्हणजेच संपूर्ण देशात मराठी भाषा ही तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाते. देशात तब्बल 7.1 टक्के लोक हे मराठी भाषा बोलतात. खरोखरच हा आकडा नक्कीच अत्यंत मोठा म्हणावा लागणार आहे.

मराठीनंतर तामिळ आणि तेलगू भाषेचा नंबर येतो. असे सांगितले जाते की, मराठी भाषेचा इतिहास हा तब्बल 1500 वर्षे जुना आहे. मुळात म्हणजे आपल्या देशात प्रत्येक राज्याची वेगवेगळी भाषा आहे. लोक आपली बोली भाषा बोलू इच्छितात. हेच नाही तर प्रत्येकाला आपली स्वत: ची भाषा अधिक बोलण्यास आवडते.

मराठी भाषेला खूप जास्त महत्व आहे. मराठी भाषा दिन आता उद्या मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. मराठी भाषा टिकवण्यासाठी अनेक संघटना या काम करताना दिसत आहेत. हेच नाही तर महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात, असा निर्णयही काही दिवसांपूर्वीच कोर्टाने दिलाय. अनेक दुकानांवर इतर भाषेतील पाट्या देखील बघायला मिळतात.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.