AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जागतिक तापमानवाढीमुळे उंदरांची संख्या वाढतेय,संशोधनात काय झाले उघड?

सायन्स अ‍ॅडव्हान्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, उंदरांची संख्या सतत वाढत आहे. संशोधनात असे म्हटले आहे की याचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे उंदरांची संख्या वाढतेय,संशोधनात काय झाले उघड?
| Updated on: Feb 05, 2025 | 9:43 PM
Share

उंदीर आणि घुशींची वाढती संख्या केवळ भारताची समस्या राहली नाही तर आता ती जागतिक समस्या बनली आहे. अलिकडे संशोधकांनी एक अभ्यास सादर केला आहे. त्यात ग्लोबल वार्मिंगमुळे उंदराची संख्या वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जगभरातील प्रमुख शहरात उंदरांची संख्या वेगाने वाढत आहे. उंदराच्या दोन प्रमुख जाती रॅट्स नॉर्वेजिकस आणि रॅट्स सर्वजगभर पसरलेल्या आहेत. उंदराच्या अनियंत्रित वाढीमुळे मानवाचे रोजचे जीवन तर प्रभावित होत आहेच शिवाय आरोग्याचे संकट देखील निर्माण झाले आहे.

सायन्स एडवांसेज पुत्रिकेत प्रकाशित प्रबंधानुसार उंदराच्या वाढीचा थेट संबंध ग्लोबल वार्मिंगशी आहे.उंदराच्या दोन प्रमुख जात जगभर पसरलेल्या असून ५० हून अधिक जुनोटिक आजारांचे उंदीर हे वाहक असल्याचे उघडकीस आले आहे.

अमेरिकेतली १६ प्रमुख शहरापैकी ११ शहरात उंदराची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.वाढते तापमान, शहरीकरण आणि अन्नाची उपलब्धता त्यामुळे उंदीर वाढत आहेत. न्यूयॉर्क, एम्स्टर्डममध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. तर काही शहरात ही वाढ कमी झाली आहे. तापमान वाढ, दाट लोकसंख्या, जंगलाचे  कमी प्रमाण यामुळे उंदीराच्या संख्येत वाढ झाली आहे. अभ्यासात म्हटले आहे की बहुतांशी छोट्या सस्तन प्राण्याप्रमाणेच उंदराची सक्रीयता थंड तापमानात घडते. जेव्हा तापमान घटते तेव्हा उंदरांची पैदास घटते.

उंदरामुळे शेती पिके, अन्नपुरवठा योजनांना बसणारा फटका यातून अमेरिकेला होणारे नुकसान जवळपास २७ अब्ज डॉलर इतके आहे. उंदरामुळे लेप्टोस्पायरोसिस, हंटाव्हायरस पल्मोनरी सिंड्रोम, म्यूरिन टाइफस आणि ब्यूबोनिक प्लेग सारखे आजार पसरतात. उंदराची संख्या नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेला ५०० दशलक्ष डॉलर खर्च करावे लागत आहेत.

सामूहिक प्रयत्न करण्याची गरज

उंदराच्या या जटील समस्येवर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर सामूहिक प्रयत्न करण्याची तातडीने आवश्यकता आहे. यावर संशोधनात भर देण्यात आला आहे. उंदरांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आक्रमक रणनीती आवश्यक असल्याचे अभ्यासाचे प्रमुख संशोधक जोनाथन रिचर्डसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटले आहे . या वाढत्या समस्येवर मात करण्यासाठी कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेला प्राधान्य देणे हे देखील एक महत्त्वाचे पाऊल आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.