‘जेलीफिश पेरेंटिंग’ म्हणजे काय? मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त की हानिकारक? जाणून घ्या सविस्तर!
आजच्या पालकांना कधीकधी कडक शिस्त लावावी की मुलांना स्वातंत्र्य द्यावं, यामध्ये गोंधळ वाटतो. अशातच ‘जेलीफिश पेरेंटिंग’ ही नवी पालकत्वाची शैली सध्या चर्चेत आहे. या शैलीची वैशिष्ट्यं, फायदे आणि नुकसान समजून घ्या आणि आपल्या मुलाच्या संगोपनासाठी वापरायचे का नाही हे ठरवा.

सध्याच्या काळात मुलांना घडवताना कोणती पद्धत वापरावी, हे अनेक पालकांसमोर मोठं आव्हान असतं. शिस्त लावावी का स्वातंत्र्य द्यावं, हे ठरवणं कठीण होतं. अशातच ‘जेलीफिश पेरेंटिंग’ (Jellyfish Parenting) नावाचं एक नवं पालकत्वाचं मॉडेल चर्चेत आलं आहे. विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये सुरुवात झालेली ही पद्धत आता भारतातही विचारात घेतली जात आहे. पण ही पद्धत नेमकी काय आहे, आणि ती तुमच्या मुलांसाठी फायदेशीर ठरेल की नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे.
काय असते जेलीफिश पेरेंटिंग?
‘जेलीफिश’ म्हणजे समुद्रातली एक नाजूक आणि मऊसर प्राणी. त्याचं नाव वापरून तयार झालेली ही पालकत्व शैली म्हणजे जिथे पालक खूपच सौम्य असतात, मुलांवर फारशा निर्बंध न लादता त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतात. या पद्धतीत मुलांना त्यांच्या अनुभवांतून शिकण्याची संधी दिली जाते. शिस्तीपेक्षा मोकळेपणा, आदेशाऐवजी संवाद आणि मार्गदर्शनावर भर दिला जातो.
याचे फायदे काय?
या प्रकारात मुलांच्या आत्मविश्वासात वाढ होते. त्यांनी स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकावं, यासाठी ही पद्धत उपयोगी ठरते. पालक आणि मुलांमध्ये नातं अधिक घट्ट होतं, कारण मुलं आपले विचार, भावना मोकळेपणाने शेअर करतात. यामुळे मुलांचं कम्युनिकेशन स्किल्सही सुधारतं आणि त्यांना भावनिक आधार मिळतो.
याचे तोटे काय?
जास्त स्वातंत्र्य देणं ही संकल्पना जरी चांगली वाटली, तरी त्याचे काही तोटेही स्पष्टपणे समोर येतात. अशा प्रकारात मुलांमध्ये शिस्तीची भावना कमी होते. निर्णय घेण्याच्या क्षमतेवर अनिश्चितता दिसते. जबाबदारी स्वीकारण्याची सवय लागत नाही. काही वेळा मुलं पालकांच्या सीमांना धक्का देतात आणि गैरवर्तन करतात. यामुळे भविष्यकाळात ते सामाजिक व्यवहारातही अडखळू शकतात.
काय विचार करायला हवा?
पालकत्व ही एक सतत शिकण्याची प्रक्रिया आहे. जेलीफिश पेरेंटिंगमध्ये मिळणारं स्वातंत्र्य जरी आकर्षक वाटत असलं, तरी त्याचबरोबर योग्य मर्यादा आणि मूल्यमाJellyfish parenting, parenting styles, child freedom, gentle parenting, parenting in modern age, जेलीफिश पेरेंटिंग, मुलांच्या वाढीचे प्रकार, स्वातंत्र्यपालन, मुलांचे पालकत्व, आधुनिक पालक पद्धतीपनाचीही गरज आहे. मुलांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देताना, त्यांना शिस्त, जबाबदारी आणि योग्य चुकीचं भान देणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
