सौरभ कृपाल पहिले समलैंगिक जज होणार?; पण, LGBTQIA+ म्हणजे काय रे भाऊ?

ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.

सौरभ कृपाल पहिले समलैंगिक जज होणार?; पण, LGBTQIA+ म्हणजे काय रे भाऊ?
senior advocate Saurabh Kirpal
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Nov 16, 2021 | 4:49 PM

नवी दिल्ली: ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. विशेष म्हणजे ते देशातील पहिलेच समलैंगिक जज ठरणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा LGBTQIA+ बाबतची चर्चा सुरू झाली आहे. नेमकं LGBTQIA+ काय आहे? या इंग्रजी वाक्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे? यावर टाकलेला हा प्रकाश…

LGBTQIA+ म्हणजे काय?

LGBTQIA+ या प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र अर्थ आहे. L-लेस्‍बियन, G-गे, B-बायसेक्‍सुअल, T-ट्रान्सजेंडर आणि L-क्वियर लोक. त्यामुळेच त्याला LGBTQIA+ म्हटलं जातं.

LGBTQIA+ च्या प्रत्येक अक्षराचं महत्वं

L – लेस्बियन: समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या महिलांसाठी लेस्बियन हा शब्द वापरला जातो. म्हणजे दोन महिलांमध्ये शारीरिक आकर्षण असतं.

G-गे: तर समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना गे म्हटलं जातं. वकील सौरभ कृपाल या कॅटेगिरीत येतात.

B -बायसेक्शुअल: दोन्ही प्रकारच्या जेंडरकडे आकर्षित असणाऱ्या स्त्री आणि पुरुषाला बायसेक्शुअल म्हटलं जातं. म्हणजे महिला आणि पुरुष दोघेही बायसेक्शुअल असतात.

T- ट्रान्सजेंडर: तृतीयपंथीयांसाठी हा शब्द वापरला जातो. पुरुष म्हणून जन्माला आल्यानंतर जसजसं वय वाढतं तसं काही लोकांमध्ये स्त्रीत्वाची भावना जागरूक होते. ते स्वत:ला मुलगीच समजू लागतात. नंतर हे लोक स्वत:ला स्त्री समजून वावरू लागतात. त्यांना ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी म्हटलं जातं.

Q – क्विअर: एलजीबीटी समुदायात हा शब्द खूप उशिरा जोडला गेला. ज्यांना आपल्या शरीराबद्दल अजिबात आकर्षण वाटत नाही अशा लोकांना क्विअर म्हटलं जातं. हे लोक स्वत:ला स्त्रीही मानत नाहीत आणि पुरुषही मानत नाहीत. हे लोग गे नसतात. लेस्बियन नसतात आणि बायसेक्शुअलही नसतात.

I- इंटरसेक्स: हा शब्दही एलजीबीटी समुदायात उशिराने समाविष्ट केला गेला. ज्यांच्या शरीरात सामान्य प्रजनन अंग नसते अशांचा यात समावेश होतो. हे लोक दिसायला स्त्री किंवा पुरुषांसारखे असतात. मात्र, ते जसे दिसतात त्याच्या विपरीत जेंडरचे ते असतात.

A- एसेक्शुअल: एसेक्शुअलला एलाई सुद्धा म्हटलं जातं. कोणत्याही जेंडरकडे ही लोकं आकर्षित होत नाही.

+ प्लस : LGBTQIA समुदायच्या मागे + हे चिन्ह जोडलं गेलं आहे. याचा अर्थ जे लोक LGBTQIA समुदायाच्या कॅटेगिरीत जे लोक फिट बसत नाहीत. ते या समुदायाला जोडले जाऊ शकतात.

संबंधित बातम्या:

मिठापासून पिठापर्यंत सर्वच महाग… भारतच नव्हे तर जगभरात भडकतोय महागाईचा आगडोंब; कारण काय?

“Mars Edition” tomato ketchup, आता मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप !

NASA Moon Mission: चंद्र मोहीम पुन्हा पुढे ढकलली, जेफ बेझोसची कंपनी ‘ब्लू ओरिजिन’ बनली मोठं कारण?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें