मुंग्या सरळ रेषेत का बरं चालतात?, त्यामागे आहे इंट्रेस्टिंग कारण…

मुंग्या आपल्या आजूबाजूला कायमच आढळतं. मग ते स्वयंपाक घर असो, वा बेडरूम कुठेही मुंग्या असतात. आपल्याकडे लाल आणि काळ्या रंगाच्या मुंग्या साधारणपणे आढळतात. तर काही इतर देशांमध्ये हिरव्या आणि केशरी रंगाच्या देखील मुंग्या सामान्यपणे आढळतात.

मुंग्या सरळ रेषेत का बरं चालतात?, त्यामागे आहे इंट्रेस्टिंग कारण...
मुंग्या
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 10:47 AM

मुंबई : मुंग्या आपल्या आजूबाजूला कायमच आढळतं. मग ते स्वयंपाक घर असो, वा बेडरूम कुठेही मुंग्या असतात. आपल्याकडे लाल आणि काळ्या रंगाच्या मुंग्या साधारणपणे आढळतात. तर काही इतर देशांमध्ये हिरव्या आणि केशरी रंगाच्या देखील मुंग्या सामान्यपणे आढळतात. आपल्या सर्वांनाच मुंगीबद्दल जरा जास्त आकर्षण आहे. कारण मुंग्या ह्या नेहमी एका रांगेत चालतात. आपण बोलताना अनेकवेळा उदाहरण देखील देतो की, मुंग्यांसारखे सरळ एका रांगेत चाला. (Why ants walk in a straight line read this Article)

या मुंग्या एवढ्या एका रांगेत कशा चालतात, त्यामागील नेमके काय कारण आहे. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  संपूर्ण जगामध्ये मुंग्याच्या साधारण 12,000 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. मुंग्यांचे वैशिष्ट म्हणजे एक मुंगी आपल्या वजनापेक्षा जास्त 20 पट वजन उचलू शकते. आपल्या सर्वांना वाटते की, या पृथ्वीवर मानवाची संख्या ही सर्वात जास्त आहे. मात्र, हे चुकीचे असून या पृथ्वीवर मानवांपेक्षा कितीतरी पटीने जास्त मुंग्याची संख्या आहे. प्रत्येक मुंगीच्या कळपात एक राणी मुंगी असते. राणी मुंगीचे आयुष्य 30 वर्षे असते.

मुंग्यांची अन्न शोधण्याची पध्दत

मुंग्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा वास शोधण्याची प्रचंड क्षमता असते. त्यांच्या अँटेनावर ओलफॅक्‍ट्री रिसेप्‍टर्स असतात. त्याच्या मदतीने मुंग्यांना अन्न शोधणे सोपे होते. विशेष म्हणजे इतर प्रकारचे कीटक आणि किडे यांच्यापेक्षा मुंग्यांकडे 4 ते 5 पट जास्त रिसेप्टर्स असतात. याच कारणामुळे मुंग्यांना त्याचा आहार लवकर शोधता येतो. त्यामुळेच आपल्या घरात कुढे अन्न पडले असेल की, मुंग्यां काही शेकंदाच्या आत तिथे पोहचलेल्या असतात. राणी मुंगी सर्व मुंग्यांसाठी अन्न शोधत असते. या मुंग्या आपल्या रिसेप्टर्सच्या मदतीने अन्नाच्या शोधात बाहेर जातात. त्यांना कुठेतरी अन्नाची माहिती मिळताच ते फेरोमोन नावाचे द्रव तिथे सोडतात. मग त्याठिकाणी बाकीच्या मुंग्या पोहचतात.

मुंग्या सरळ रांगेत चालण्याचे कारण वाचा

मुंग्यांमध्ये एक विशेष प्रकारचे रसायन आढळते, ज्याचे नाव फरमोन्‍स आहे. या रसायनाच्या मदतीने मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात. रांगेत चालत असताना पुढे काही अडचण असेल तर सर्वात पुढची मुंगी रसायनाच्या मदतीने इतर मुंग्यांना सतर्क करते. जेंव्हा मुंग्या अन्नाच्या शोधात फिरतात आणि त्यांना अन्न मिळेत, त्यावेळी पुन्हा त्या जागेवर जाण्यासाठी मुंग्या विशिष्ट प्रकारचे द्रव्य सोडतात. यामुळे पुन्हा त्याच जागी मुंग्यांना जाण्यासाठी मदत होते. जेंव्हा एक मुंगी चालते तेंव्हा ती प्रत्येक वेळेस द्रव्य सोडते आणि त्यामुळेच इतरही मुंग्या तिच्या मागे एका रांगेत चालतात.

संबंधित बातम्या : 

Video | नवा शेखचिल्ली ! एका क्षणात झाड तोडलं, नंतर जे झालं ते एकदा पाहाच

Video | पाण्यात व्यायाम करण्याचा महिलेकडून प्रयत्न, पण ऐनवेळी भलतंच घडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | इकडे पतीने पत्नीला मिठीत घेतलं, तिकडे कुत्रा रुसला, पाहा व्हायरल व्हिडीओ

(Why ants walk in a straight line read this Article)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.