World Sparrow Day : चिमण्यांची घटती संख्या पर्यावरणासाठी धोकादायक

World Sparrow Day : चिमण्यांची घटती संख्या पर्यावरणासाठी धोकादायक
आज जागतिक चिमणी दिवस

आज 20 मार्च हा दिवस जगभरात जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) म्हणून साजरा करण्यात येतो. महंमद दिलावर (Mohammad Dilawar) यांनी 2006 मध्ये 'नेचर फॉरेव्हर सोसायटी' नावाची एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या पुढाकारातून 2010 पासून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

अजय देशपांडे

|

Mar 20, 2022 | 5:40 AM

आज 20 मार्च हा दिवस जगभरात जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) म्हणून साजरा करण्यात येतो. महंमद दिलावर (Mohammad Dilawar) यांनी 2006 मध्ये ‘नेचर फॉरेव्हर सोसायटी’ नावाची एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या पुढाकारातून 2010 पासून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. चिमण्यांची (Sparrow) संख्या दिवसेंदिवस घटत आहे. चिमण्यांची कमी होत असलेली संख्या पर्यावरणीय समतोलासाठी धोकादायक आहे. हेच लक्षात घेऊन नेचर फॉरेव्हर सोसायटीकडून जागतिक चिमणी दिनाची सुरुवात करण्यात आली. चिमणी हा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक असल्याने, चिमण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जे लोक चिमण्यांच्या संवर्धनासाठी काम करतात अशा लोकांचा संस्थेच्या वतीने जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने सत्कार देखील करण्यात येतो.

गेल्या 20 वर्षांमध्ये चिमण्याची संख्या 85 टक्क्यांनी घटली

दिवसेंदिवस चिमण्यांच्या संख्येमध्ये घट होत आहे. चिमणी अभ्यासकांच्या मते गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये चिमण्यांची संख्या तब्बल 85 टक्क्यांनी घटली आहे. चिमण्यांची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे चिमणी हा सामान्यपणे मनुष्य वस्तीच्या शेजारी राहणारा पक्षी आहे. मात्र गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये गाव तसेच शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात सिमेंटचे जंगले उभी राहिली. मोठ-मोठ्या इमारती आणि घरे बांधण्यासाठी वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली. वृक्षांची कत्तर करण्यात आल्यामुळे आणि सिमेंटच्या मजबूत इमारती उभारण्यात आल्याने चिमण्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला. दुसरे महत्त्ववाचे कारण म्हणजे तंत्रज्ञान वाढले, आज आपण 5 जीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडियशनमुळे अनेक पक्ष्यांचे जीव धोक्यात आले आहेत. या पक्ष्यांच्या यादीत चिमणीचा देखील समावेश होतो. रेडियशनमुळे चिमणीचा केवळ मृत्यूच होत नाही तर त्यांच्या प्रजनन क्षमतेवर देखील गंभीर परिणाम होतो. त्यामुळे दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी होत आहे.

पिकांवरील रोगराईचे प्रमाण वाढले

चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याचे अनेक गंभीर परिणाम हे विविध परिसंस्थांवर पहायला मिळत आहेत. चिमण्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम हा शेतातील पिकांवर झाला आहे. पिकांवर पडणाऱ्या रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चिमण्यांचे मुख्य खाद्य अळ्या आणि छोटे-छोटे किटक असतात. पूर्वी चिमण्यांची संख्या मोठ्याप्रमाणात होती. चिमण्या पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किडे फस्त करत असत. मात्र आता चिमण्यांची संख्या कमी झाल्याने पिकांवर पडणाऱ्या अळ्या, किड्यांचा उपद्रव अधिक वाढला आहे, परिणामी पिकात देखील घट होते. पिक चांगले येण्यासाठी आता आपल्याला विविध किटक नाशकांचा वापर करावा लागत आहे. ही किटकनाशके शरीरासाठी हानीकारक असतात. चिमण्या नैसर्गिक पद्धतीने पिकांचे संरक्षण करतात.

संबंधित बातम्या

Asani Cyclone : जाणून घ्या चक्रीवादळांची नावे कशी ठरवली जातात आणि याची प्रक्रिया नेमकी काय आहे!

एक दोन नव्हे तब्बल 2 हजार 779 मोबाईल्सचा मालक आहे हा व्यक्ती, Guinness World Records मध्ये नोंद

TRP: कशी ठरविली जाते टीव्ही न्यूज चॅनल्सची रेटिंग, BARC म्हणजे नेमके काय? टीआरपी मोजण्यासाठी कोणत्या तांत्रिक पद्धतीचा केला जातो वापर?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें