राज्याला स्वाईन फ्लूचा विळखा, महिनाभरात 15, तर 9 महिन्यात 212 जणांचा मृत्यू 

राज्यात स्वाईन फ्लूचा (Swine-flu)  पुन्हा एकदा विळखा घातला आहे. राज्यात एका महिन्यात 15 जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे (Swine-flu) मृत्यू झाला आहे.

राज्याला स्वाईन फ्लूचा विळखा, महिनाभरात 15, तर 9 महिन्यात 212 जणांचा मृत्यू 

पुणे : राज्याला पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने (Swine-flu) विळखा घातला आहे. राज्यात एका महिन्यात 15 जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे (Swine-flu) मृत्यू झाला आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत 9 महिन्यात 212 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक 42 रुग्णांचा नागपूरमध्ये मृत्यू (Swine-flu died) झाला आहे. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये 33 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने (Health organisation) याबाबतची माहिती दिली आहे.

गेल्या 9 महिन्यात राज्यात 2 हजार 207 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यातील 90 रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 1 जानेवारी ते 18 सप्टेंबर या दरम्यान राज्यात 21 लाख 18 हजार स्वाईन फ्लूच्या संशंयित (Swine-flu Patient) रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

नागपुरातील 6 जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 1 जानेवारीपासून आतापर्यंत ‘स्वाईन फ्लू’चे 368 रुग्ण (Swine-flu died) आढळले आहेत. त्यातील 42 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एकट्या सप्टेंबर महिन्यात 5 पेक्षा जास्त रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.

स्वाईन फ्लूचे (Swine-flu Patient) संक्रमण थंड वातावरणात झपाट्याने होते. ज्या व्यक्तींच्या अंगात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यांना स्वाईन फ्लूची लागण (swine flu symptoms) होण्याची जोखीम जास्त असते.

दरम्या स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये विदर्भातील विविध भागातील रुग्णांचा समावेश आहे. यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाल्या असून ठिकठिकाणच्या रुग्णालयात औषध साठा आणि सुविधा करण्यात आल्याचे विभागाने सांगितले आहे.

स्वाईन फ्लूची लक्षण (swine flu symptoms) काय?

  • जास्त ताप येणे
  • सतत नाक वाहणे
  • घशात खवखव होणे
  • ताप अचानक वाढणे

स्वाईन फ्लूपासून बचावासाठी उपाय

  • गर्दीच्या ठिकाणी वावर टाळा
  • खोकला किंवा सर्दी झाल्यास तोंडावर रुमाल ठेवा
  • पावसाळ्यात थंड ठिकाणी राहताना काळजी घ्या

अनेकजण ताप आला की वायरल समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र त्यानंतर त्यात तापाचे प्रमाण वाढते. त्यामुळे सुरुवातीला अशा प्रकाराचे कुठलीही लक्षण दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तातडीने उपचार सुरु करावेत.

नागपूरसह विदर्भात या आधी सुद्धा स्वाईन फ्लूची (Swine-flu Patient) दहशत निर्माण झाली होती. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे नागपूरसह पूर्व विदर्भात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढू नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी ते पूर्ण होण्यास नागरिकांचं सहकार्य सुद्धा आवश्यक आहे. मात्र त्यासाठी आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

Published On - 6:12 pm, Wed, 18 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI